‘‘द्रविडला रस नव्हता आणि आताही…”; भारताच्या नव्या हेड कोचबाबतच्या चर्चांना गांगुलीनं दिलं नवं वळण!

माध्यमांच्या वृत्तानुसार रवी शास्त्रींनंतर द्रविड हेड कोच होणार अशी चर्चा होती, पण गांगुलीनं…

rahul dravid asked for time to decided to become head coach says sourav ganguly
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाबाबत अजून संभ्रमच

भारतीय क्रिकेट संघाच्या पुढील मुख्य प्रशिक्षकाची चर्चा अजूनही थांबलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून असे मानले जात होते, की टी-२० विश्वचषक-२०२१ नंतर रवी शास्त्रींनंतर राहुल द्रविड नवीन प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारेल. राहुल द्रविडचे नाव निश्चित मानले जात होते. दरम्यान, बीसीसीआयने कोचिंग स्टाफसाठी अर्ज मागवले असून आता बोर्डाचा अध्यक्ष सौरव गांगुलीने केलेल्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. द्रविडने वेळ मागितला आहे, जेणेकरून तो टीम इंडियाचा प्रशिक्षक बनू इच्छितो की नाही याचा विचार करू शकेल. राहुलने अद्याप या प्रकरणावर स्पष्ट मत दिलेले नाही, असे गांगुलीने सांगितले.

गांगुलीने आज तक या वृत्तवाहिनीला सांगितले, “राहुल द्रविड प्रशिक्षक होणार की नाही याबाबत काहीही स्पष्ट नाही. जर त्याला अर्ज करायचा असेल तर तो करेल. प्रक्रिया सुरू राहील. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रशिक्षक आहे आणि मला वाटते, की भारतीय क्रिकेटमध्ये एनसीएची मोठी भूमिका आहे. मी आधी त्याच्याशी याविषयी बोललो होतो. त्याला त्यात रस नव्हता. मला वाटते की परिस्थिती अजूनही तशीच आहे. त्याने काही वेळ मागितला आहे. बघूया काय होते ते.”

हेही वाचा – T20 WC: ‘‘मेंटॉर जास्त काही करू शकत नाही, तो…”, सुनील गावसकरांचं वक्तव्य!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल व्यतिरिक्त, बीसीसीआयने टीमसोबत मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या अनिल कुंबळे, रिकी पाँटिंग, व्हीव्हीएस यांच्यासह काही इतर लोकांशी संपर्क साधला होता. सुरुवातीला कुंबळेचे नाव आधी पुढे आले पण नंतर त्याचे नाव शर्यतीतून बाहेर पडले. राहुल द्रविडचे नाव आठवडाभराहून अधिक काळ निश्चित असल्याचे मानले जात होते, परंतु गांगुलीच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्याने परिस्थिती धूसर झाली आहे.

४८ वर्षीय द्रविड सध्या बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम पाहत असून यापूर्वीही त्याने श्रीलंकेच्या दौऱ्यावर प्रशिक्षक म्हणून काम केल आहे. द्रविड १९ वर्षांखालील संघ आणि भारत अ संघाला प्रशिक्षणही देत आहे. अशाप्रकारे द्रविडला मुख्य संघाला प्रशिक्षण देण्यासाठी विचारणा झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मात्र द्रविडने तरुणांना क्रिकेटचे धडे देण्याला आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम पाहण्याला प्राधान्य दिले आहे. यापूर्वीही द्रविडने २०१६ आणि २०१७ साली अशाच पद्धतीची ऑफर नाकारली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rahul dravid asked for time to decided to become head coach says sourav ganguly adn

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला