Rahul Dravid Son Samit Dravid: टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविड यांचा मुलगाही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेट क्षेत्रात येत आहे. राहुल द्रविड यांचा लेक समित द्रविड आता वयाच्या १८व्या वर्षी टी-२० लीग खेळणार आहे. समित द्रविड कर्नाटकात होणाऱ्या महाराजा ट्रॉफी KSCA T20 या क्रिकेट लीगसाठी खेळताना दिसणार आहे. या लीगसाठी समित द्रविड म्हैसूर वॉरियर्स संघाकडून खेळणार आहे. या संघाकडून खेळण्यासाठी समित द्रविडसाठी किती रूपयांची बोली लागली, जाणून घ्या.

हेही वाचा – Paris Olympics 2024 Opening Ceremony Live: पॅरिस ऑलिम्पिकचे मेडल कसे तयार केले? उद्घाटन सोहळ्यात दाखवली झलक

Coco Gauff
कोको गॉफ विजेती
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Mumbai Ranji Team won Irani Cup 2024
२७ वर्षांनी मुंबईचं इराणी करंडक जेतेपदाचं स्वप्न साकार; आठव्या क्रमांकावर खेळणाऱ्या तनुष कोटियनची शतकी खेळी
Womens T20 World Cup 2024 Pak W vs Sri W match highlights in Marathi
Womens T20 WC 2024 : श्रीलंका-पाक सामन्यात रुमाल पडल्याने फलंदाजाला मिळाले जीवदान, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Harmanpreet Kaur believes in winning the ICC World Cup cricket tournament sport news
विश्वविजेतेपदाची सर्वोत्तम संधी! ऑस्ट्रेलियालाही टक्कर देण्याचा महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीतला विश्वास
Irani Cup 2024 Ajinkya Rahane lead Ranji Champion Mumbai Team
रणजी चॅम्पियन मुंबईला ‘अजिंक्य’ राखण्यासाठी रहाणे सज्ज! Irani Cup 2024 स्पर्धेत सांभाळणार धुरा
Praveen Thipse Opinion on Chess Olympiad Gold Medal sport news
ऑलिम्पियाड जेतेपदाला ऑलिम्पिक सुवर्णपदकाचेच तेज! ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांचे मत
IND vs BAN Team India squad announced for 2nd test match
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर! कोणत्या खेळाडूंना मिळाली संधी? जाणून घ्या

महाराजा ट्रॉफी KSCA T20 च्या आगामी हंगामापूर्वी खेळाडूंच्या लिलावादरम्यान म्हैसूर वॉरियर्सने समित द्रविडवर बोली लावली. वॉरियर्सने मधल्या फळीतील फलंदाज आणि वेगवान गोलंदाज समितसाठी ५० हजारांची बोली लावत त्याला संघात सामील केले. वॉरियर्स संघाच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “त्याला आमच्या संघात सहभागी करून घेणं ही आमच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे, कारण त्याने KSCA साठी विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून दाखवली आहे.”

हेही वाचा – India in Asia Cup Final: भारताची आशिया चषकाच्या अंतिम फेरीत धडक, स्मृती मानधनाचे शानदार अर्धशतक

समित कूचबिहार ट्रॉफी जिंकणाऱ्या या हंगामातील कर्नाटकच्या अंडर-१९ संघाचा भाग होता आणि त्याने या वर्षाच्या सुरुवातीला लँकेशायर संघाविरुद्ध KSCA XI कडून खेळला आहे. गत मोसमातील उपविजेत्या वॉरियर्सचे नेतृत्व करुण नायर करणार असून एक लाख रुपयांच्या किंमतीसह संघात सामील झालेल्या भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णामुळे त्यांची गोलंदाजी अधिक मजबूत होईल.

हेही वाचा – Jasprit Bumrah: “सर्वजण एकत्र होतो अन् त्याला…” हार्दिकची हुर्याे उडवली जात असताना MI संघात कसं वातावरण होतं? बुमराहचं मोठं वक्तव्य

वॉरियर्स संघाचे नेतृत्व करुण नायर करेल, त्याला संघाने कर्णधारपदावर कायम ठेवले आहे. वॉरियर्सने अष्टपैलू के गौतमला ७.४ लाख रुपयांना आणि जे सुचितला ४.८ लाख रुपयांना, तर वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला १ लाख रुपयांना विकत घेतले. कृष्णावर अलीकडेच डाव्या बाजूच्या क्वाड्रिसेप्स टेंडनवर शस्त्रक्रिया झाली. तो स्पर्धेपर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होईल. महाराजा ट्रॉफीचा २०२४ हंगाम १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत चिन्नास्वामी स्टेडियमवर सर्व सामन्यांसह आयोजित केला जाण्याची शक्यता आहे.

म्हैसूर वॉरियर्स संघ
करुण नायर, कार्तिक सीए, मनोज भंडागे, कार्तिक एसयू, सुचित जे, गौतम के, विद्याधर पाटील, व्यंकटेश एम, हर्षिल धर्मानी, गौतम मिश्रा, धनुष गौडा, समित द्रविड, दीपक देवाडिगा, सुमित कुमार, स्मयन श्रीवास्तव, जैस्पर ईजे, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सरफराज अश्रफ.