Rahul Dravid's appointment to key committees in IPL, BCCI Annual General Meeting to decide avw 92 | Loksatta

आयपीएलमधील महत्त्वाच्या समित्यांवर राहुल द्रविडची नियुक्ती, बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय

आयपीएलच्या दोन समित्यांमध्ये राहुल द्रविडचा समावेश करण्यात आला आहे. प्रशिक्षकाबरोबरच ही सुद्धा जबाबदारी बीसीसीआयने त्याच्या खांद्यावर टाकली.

आयपीएलमधील महत्त्वाच्या समित्यांवर राहुल द्रविडची नियुक्ती, बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय
प्रातिनिधीक छायाचित्र (लोकसत्ता)

राहुल द्रविडवरचा विश्वास बीसीसीआयने पुन्हा व्यक्त करत त्याच्यावर आयपीएलमधील प्रमुख समित्यांची जबाबदारी सोपवली आहे. बऱ्याच काळापासून राहुल द्रविड आयपीएल पासून लांब होता. मागील चार वर्षापासून त्याने कोणतेही काम पाहिले नव्हते. मात्र, आता त्यांचा आयपीएलच्या दोन समित्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यांचा समावेश मागील वर्षीच या समित्यांमध्ये करण्यात आला होता. मात्र,‌ यासंबंधीची गुप्तता पाळली गेलेली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या तीन समित्यांपैकी दोन समित्यांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

सौरव गांगुली आणि जय शाह यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता येथे झालेल्या बीसीसीआयच्या शेवटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत द्रविड यांचा लीगच्या आचारसंहिता समिती आणि तांत्रिक समितीत समावेश करण्यात आला असून नुकत्याच राज्य संघटनांना पाठवल्या गेलेल्या एजीएमच्या पत्रकांमध्ये राहुल द्रविड यांच्या नावाचा उल्लेख आहे.

हेही वाचा   :  मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक २० ऑक्टोबरला 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ९ हजार कोटींहून अधिक निधी न्यायिक खटल्यात रोखला होता याचाही या पत्रकात उल्लेख आहे. बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघटनांकडील ९,००० कोटींहून अधिक निधी अनुत्पादक आणि अनुचित खटल्यात अडकला आहे. याचा उपयोग चांगल्या सुविधांसह खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच या खेळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी केला जाऊ शकतो.

हेही वाचा   : ICC T20I Team Rankings: ऑस्ट्रेलिया मालिकेतील विजयाने ट्वेंटी-२०त भारत अव्वलस्थानी! पाकिस्तान पडला मागे  

तसेच, मागील तीन वर्षांपासून बीसीसीआयच्या समालोचकांच्या पॅनेलमधून बाहेर असलेले संजय मांजरेकर यांचे पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत ते समालोचन करताना दिसतील. २०२० मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर मांजरेकर यांना वगळण्यात आले होते. पण त्याच यावर्षी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेसाठी त्यांचा या पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
ICC T20I Team Rankings: ऑस्ट्रेलिया मालिकेतील विजयाने ट्वेंटी-२०त भारत अव्वलस्थानी! पाकिस्तान पडला मागे

संबंधित बातम्या

समलैंगिक साथीदारासोबत अ‍ॅथलीट द्युती चंदचा विवाह? सोशल मीडियावर ‘तो’ फोटो व्हायरल!
Video: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स
“तो खेळाडू भारताला विश्वचषक जिंकवून देईल” ब्रेट ली म्हणाला, “रोहित, द्रविडने फक्त….”
IPL 2023: ‘टॅक्टिकल सबस्टिट्युशन म्हणजे काय रे भाऊ?’ आयपीएलच्या १५व्या हंगामापासून सुरु होणार नवीन नियम
Video: आई बाबा नव्हे मनात फक्त ‘ती’ व्यक्ती…ऋतुराज गायकवाडने सांगितलं ६ बॉलमध्ये ७ षटकार मारण्याचं गुपित

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण : रितेश-जिनीलियाच्या कंपनीची होणार चौकशी; मविआ सरकारदरम्यान लागले गैरव्यवहाराचे आरोप, नेमकं प्रकरण काय?
खळबळजनक! पिस्तुलातून गोळ्या झाडत कोयत्याने केले वार, पिंपरीत सिनेस्टाईल भर चौकात एकाचा खून
FIFA World Cup 2022: ब्राझीलला हरवून कॅमेरूनने रचला इतिहास, तर स्वित्झर्लंड प्री-क्वार्टर फायनलमध्ये दाखल
“तुम्ही जन्मत:च हिंस्र विकृत आहात की…” सुमीत राघवनला नेटकऱ्याचा प्रश्न; अभिनेत्याच्या आरे कारशेडवरील ‘त्या’ वादग्रस्त ट्वीटनंतर रंगले ट्विटर वॉर
विश्लेषण: नागरिकत्व सुधारणा कायद्यात तामिळी निर्वासितांचा मुद्दा का आला? द्रमुकचा कायद्याला तीव्र विरोध का?