IPL 2022 : राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर ठरला ऑरेंज कॅपचा मानकरी

राजस्थान रॉयल्सचा फलंदाज असलेल्या जोस बटलरसाठी आयपीएलचा १५वा हंगाम अतिशय चांगला ठरला.

Jose Buttler
जोस बटलर ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला

इंडियन प्रीमियर लीग या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या १५व्या हंगामाला आपल्या विजेता मिळाला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने सात गडी राखून राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. या पराभवामुळे १४ वर्षानंतर दुसरे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले आहे. असे असले तरी राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरने मात्र, ऑरेंज कॅपची शर्यत जिंकली आहे. त्याने आयपीएलच्या या हंगामात केवळ सर्वाधिक धावाच केल्या नाहीत, तर सर्वाधिक शतकेही ठोकण्याचीही किमया केली आहे.

जोस बटलरने यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये पहिल्या सामन्यापासून शेवटपर्यंत सातत्यपूर्ण फलंदाजी केली. जोस बटलरने ८३ चौकार आणि ४५ षटकारांच्या मदतीने आणि ५७.५३ च्या सरासरीने ८६३ धावा करत ऑरेंज कॅप जिंकली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १४९.०५ इतका जबरदस्त राहिला आहे. त्याने या हंगामामध्ये एकूण चार शतके आणि चार शतके झळकावली आहेत. ११६ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. मात्र, तो विराट कोहलीचा चारपेक्षा जास्त शतकांचा विक्रम मोडू शकला नाही.

विशेष म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज त्याच्या आसपासही दिसत नव्हता. जोस पाठोपाठ लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने १५ सामन्यात ६१६ धावा केल्या. लखनऊकडून खेळणाऱ्या क्विंटन डी कॉकने तिसऱ्या क्रमांकावर राहत १५ सामन्यात ५०८ धावा केल्या. या सर्वांना मागे सोडून जोस फार पुढे गेला. मात्र, सातत्यापूर्ण खेळ करूनही त्याला आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात यश आले नाही.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप आणि १५ लाख रुपये बक्षिस रक्कम दिली जाते. यावर्षी ही रक्कम जोस बटलरला देण्यात आली. याशिवाय त्याला ‘मॅन ऑफ द सिझन’च्या पुरस्कारानेही गौरवण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rajasthan royals jose buttler hold the orange cap in ipl 2022 vkk

Next Story
IPL 2022 Final : गुजरात टायटन्सचा राजस्थानवर ‘रॉयल’ विजय, पदार्पणाच्या हंगामात पटकावले विजेतेपद
फोटो गॅलरी