राजस्थान रॉयल्सने आगामी आयपीएल पर्वासाठी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. कर्णधार संजू सॅमसन राजस्थान संघात कायम राहणार आहे. सॅमसनला फ्रेंचायझीने पुढील तीन वर्षांसाठी कायम ठेवले आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, संजू संघाचा कर्णधारही असेल. त्याच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सचा संघ गेल्या मोसमात सातव्या स्थानावर राहिला होता.

संजू सॅमसनशिवाय राजस्थान रॉयल्सच्या संघाला आणखी तीन खेळाडूंना कायम ठेवायचे आहे. फ्रेंचायझी चार खेळाडूंना कायम ठेवू इच्छित आहे. दुसरीकडे, संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सने १४ कोटींच्या करारासह कायम ठेवले आहे.

लिलावाच्या नियमांनुसार, जर एखाद्या फ्रेंचायझीने चार खेळाडूंना कायम ठेवले, तर पहिल्या खेळाडूचा करार १६ कोटींचा असावा. मात्र, सॅमसनने केवळ १४ कोटींमध्ये संघाकडून खेळण्यास होकार दिला आहे. दुसरीकडे, जर राजस्थान रॉयल्सने चार खेळाडूंना कायम ठेवले तर ते ४८ कोटींच्या पर्ससह लिलावात उतरतील.

हेही वाचा – VIDEO : किती तो राग..! अंपायरनं फेटाळलं LBWचं अपील; मग भारताच्या राहुल चहरनं केलं ‘असं’ वर्तन!

राजस्थान रॉयल्सने २०१८मध्ये संजू सॅमसनचा ८ कोटी रुपयांसह संघात समावेश केला होता. आयपीएलच्या १४व्या हंगामात त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले. मात्र, कर्णधार म्हणून तो फारसा यशस्वी ठरला नाही. पण एक फलंदाज म्हणून त्याचा मागचा मोसम खूप यशस्वी ठरला. आयपीएल २०२१ मध्ये त्याने १३७च्या स्ट्राइक रेटने ४८४ धावा केल्या.