Rajasthan Royals New Owner: आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या इतिहासातील पहिला चॅम्पियन संघ असलेल्या राजस्थान रॉयल्सला नवे मालक मिळाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रक्रियेनंतर आता राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकावर शिक्कामोर्तब झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी भारतीय वंशाचे ब्रिटिश उद्योगपती मनोज बदाले आणि इतर व्यावसायिकांच्या मालकिची होती. आता ही फ्रँचायझी किती कोटींना आणि कोणी विकत घेतली जाणून घेऊया.

राजस्थान रॉयल्स संघाला मिळाले नवे मालक

राजस्थान रॉयल्सच्या विक्रीचा व्यवहार अखेर १.६५ मिलियन डॉलर्सच्या विक्रमी बोलीसह पूर्ण झाला आहे. यापूर्वी राजस्थान रॉयल्सची ब्रँड व्हॅल्यू १४६ मिलियन म्हणजेच १,२६२ कोटी इतकी होती. आता ही किंमत वाढली असून फ्रँचायझीची ब्रँड व्हॅल्यू१६५ मिलियन म्हणजेच १५ कोटीच्या घरात पोहोचली आहे. अमेरिकन उद्योगपती कल सोमानी आणि त्यांच्या समूहाने या फ्रँचायझीसाठी सर्वाधिक बोली लावली होती, जी स्वीकारण्यात आली आहे.

अमेरिकेत स्थायिक असलेले उद्योजक काल सोमाणी यांनी आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स ही फ्रँचायझी खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. ही रक्कम एकरकमी दिली जाणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सोमाणी यांना वॉलमार्ट कुटुंबातील अमेरिकन उद्योगपती रॉब वॉल्टन आणि हॅम्प कुटुंबाचा पाठिंबा आहे. आयपीएल २०२६ हंगामानंतर ही विक्री अधिकृतपणे लागू होणार आहे.

आयपीएलच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार ठरणार आहे. गेल्या वर्षी टॉरेंट ग्रुपने सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्सकडून गुजरात टायटन्समधील ६७% हिस्सा सुमारे ५,०२५ कोटी रुपयांना विकत घेतला होता, ज्यामुळे त्या फ्रँचायझीची एकूण किंमत सुमारे ७५०० कोटी रुपये ठरली होती. सीव्हीसी कॅपिटलने २०२१ मध्ये ५६२६ कोटी रुपयांना संघ खरेदी केल्यानंतरही ३३% हिस्सा स्वतःकडे ठेवला होता.

राजस्थान रॉयल्स संघ खेरदी करणारे काल सोमाणी कोण आहेत?

काल सोमाणी हे अमेरिकेतील अ‍ॅरिझोनामधील स्कॉट्सडेल येथे राहणारे एक सिरीयल उद्योजक आहेत. शिक्षण-तंत्रज्ञान (ed-tech), डेटा प्रायव्हसी, AI गव्हर्नन्स आणि स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांना १५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. ते IntraEdge या टेक सर्व्हिसेस कंपनीचे आणि Truyo या डेटा प्रायव्हसी प्लॅटफॉर्मचे संस्थापक आहेत. याशिवाय, AI गव्हर्नन्सशी संबंधित उपक्रमांमध्येही त्यांचा सहभाग राहिला आहे.

क्रीडा क्षेत्रातही ते सक्रिय असून मोटर सिटी गोल्फ क्लबचे सह-मालक आहेत. तसेच TMRW स्पोर्ट्स आणि टीजीएल गोल्फ लीग यांसारख्या उपक्रमांमध्ये त्यांनी सुरुवातीच्या टप्प्यात गुंतवणूक केली आहे. राजस्थान रॉयल्ससोबत त्यांचा व्यवहार २०२१ पासून. त्यांनी २०२१ मध्ये प्रथमच या फ्रँचायझीत गुंतवणूक केली होती. त्या वेळी त्यांनी आयपीएलच्या वाढीच्या क्षमतेबद्दल मोठा विश्वास व्यक्त केला होता आणि त्याचाच परिणाम म्हणून आता ते या संघात मोठा हिस्सा मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे मानले जाते.