RR vs RCB Weather Update: आयपीएल २०२६ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियममध्ये होणार आहे. गेल्यावेळी याच मैदानावर राजस्थान रॉयल्सचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध पार पडला होता. या सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सामना सुरू व्हायला उशीर झाला होता. शेवटी ११-११ षटकांचा सामना खेळवण्यात आला. दरम्यान आज होणाऱ्या सामन्यादरम्यान हवामान कसं असेल? जाणून घा हवामानाचा अंदाज.

हा सामना हाय व्होल्टेज होणार यात काहीच शंका नाही. कारण दोन्ही संघ अजून तरी अजिंक्य आहेत. त्यामुळे दोघांपैकी एक संघाचा या हंगामातील पहिला पराभव होणं निश्चित आहे. एका बाजूला युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशीची जोडी असणार आहे. तर बंगळुरूकडून विराट आणि टीम डेव्हिडसारखे अनुभवी खेळाडू असणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल.

गुवाहाटीत पाऊस पडणार का?

गुवाहाटीत आज पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी अशी की, सामना सुरू होण्याआधी पाऊस पडेल आणि सामन्यावेळी आभाळ मोकळं असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ॲक्यूवेदरनुसार, सामन्यावेळी पाऊस पडण्याची शक्यता ही केवळ ३ टक्के इतकी असणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळू शकतो.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेईंग ११:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), टीम डेव्हिड, जितेश शर्मा ( यष्टिरक्षक), रोमारिओ शेफर्ड, कुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग, जेकब डफी, सुयश शर्मा .

राजस्थान रॉयल्सची संभावित प्लेईंग ११:

वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रियान पराग (कर्णधार), शिमरन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर , नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, रवी बिश्नोई