scorecardresearch

मुंबई रणजी प्रशिक्षकपदासाठी रमेश पोवारचा अर्ज

माजी प्रशिक्षक समीर दिघे यांचा राजीनामा

रमेश पोवार (संग्रहीत छायाचित्र)
रमेश पोवार (संग्रहीत छायाचित्र)

भारताचा माजी फिरकीपटू रमेश पोवर याने मुंबई संघाच्या रणजी प्रशिक्षकपदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. पीटीआयशी बोलत असताला रमेशने खुद्द या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधीत्व केलेल्या रमेश पोवारच्या नावावर ६ कसोटी तर ३४ वन-डे बळी जमा आहेत. याआधी रमेश पोवारने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या इनडोअर क्रिकेट अकादमीच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. मुंबईचे माजी प्रशिक्षक समीर दिेघे यांनी आपला कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामा दिल्याने मुंबईच्या प्रशिक्षकपदाची जागा सध्या रिक्त आहे.

मागच्या हंगामात समीर दिघेंच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या संघाला फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नव्हती. त्यामुळे आपला कार्यकाळ संपल्यानंतर दिघे यांनी पुन्हा प्रशिक्षकपदासाठी अर्ज भरण्यास रस दाखवला नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई क्रिकेट असोसिएशन आपल्याकडे आलेल्या अर्जांवरुन उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम निवड करणार आहे. त्यामुळे रणजी क्रिकेटमध्ये दादा संघ मानल्या जाणाऱ्या मुंबईच्या संघाचं प्रशिक्षकपद कोणाला मिळतंय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-07-2018 at 06:33 IST

संबंधित बातम्या