Romance In PSL: पाकिस्तान सुपर लीग म्हणजेच पीएसएल २०२६ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. स्पर्धेतील दुसऱ्या एलिमिनेटरचा सामना १ मे रोजी हैदराबाद किंग्समन आणि इस्लामाबाद युनायटेड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात हैदराबाद किंग्समन संघाने २ धावांनी विजय मिळवला. या सामन्याआधी पाकिस्तानचे माजी खेळाडू आणि समालोचक रमीझ राजा आणि ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू लिसा स्थळेकर यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत रमीझ राजा समालोचकाच्या भूमिकेत आहेत. या स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान रमीझ राजा आणि लिसा स्थळेकर हे दोघेही एकत्र समालोचन करत होते. त्यावेळी रमीझ राजा आणि लिसा स्थळेकरला मिठी मारली.

ही घटना लाईव्ह समालोचन करत असताना घडली. त्यावेळी मुल्तान सुल्तान्स संघाच्या डावातील १९ वे षटक सुरु होते. त्यावेळी चर्चा करत असतानाच लिसा स्थळेकरने रमीझ राजा यांना मिठी मारली. दोघेही मिठी मारल्यानंतर हसताना दिसून आले. पण हा फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा आधीपासूनच क्रिकेट व्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. आधी खेळाडूंमुळे स्पर्धा चर्चेत होती, आता समालोचकांनी यात भर घातली आहे. नेटकऱ्यांनी या पोस्टवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने लिहिले की, “रमीझ राजा समालोचनकक्षात आनंदाचे काही क्षण घालवताना…”, तर आणखी एका युझरने लिहिले की, “पाकिस्तान सुपर लीगमध्ये हे काय सुरु आहे..?”, तर आणखी एका युझरने लिहिले की, “आपण आयपीएल पाहण्यात व्यस्त आहे.. तर दुसरीकडे रमीझ राजा समालोचन कक्षात रोमान्स करण्यात व्यस्त आहेत.”

रमीझ राजा हे पाकिस्तानच्या १९९२ वर्ल्डकप विजेत्या पाकिस्तान संघाचे भाग राहिले आहेत. यासह हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष देखील होते. तर दुसरीकडे लिसा स्थळेकर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघातील माजी अष्टपैलू खेळाडू आहे. तिच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये २७२८ धावा करण्याची नोंद आहे. तर गोलंदाजी करताना तिने १४६ गडी बाद केले आहेत.