पुढच्या वर्षीच्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे, परंतु ऑक्टोबरमध्ये बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक निवेदन दिले होते, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की ते तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याचे नियोजित आहे, कारण टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार नाही. त्या वक्तव्यानंतर त्याबाबतचा वाद वाढत चालला आहे. बीसीसीआयच्या त्या वक्तव्यावर पीसीबीकडून अशी प्रतिक्रिया आली होती की, जर संघ भारतात गेला नाही तर पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भाग घेणार नाही. आम्ही तुम्हाला सांगूया की भारत २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळवला जात आहे. तब्बल १७ वर्षांनंतर इंग्लिश संघ पाकिस्तानच्या धरतीवर कसोटी मालिका खेळत आहे. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी एक वक्तव्य करून बीसीसीआयला आव्हान दिले आहे. खरं तर आशिया चषक २०२३चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआयने याआधीच स्पष्ट केले आहे. यावरूनच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी बीसीसीआयला आव्हान दिले आहे.

पत्रकारांशी बोलताना राजा म्हणाले की “एशियन क्रिकेट कौन्सिलने (एसीसी) आम्हाला आशिया चषक दिला आहे आणि भारत म्हणतो, आम्ही येणार नाही. मी सहमत आहे, त्यांना राजकीय समस्या आहे, म्हणून ते आले नाहीत, पण आशिया चषक आम्हाला तटस्थ ठिकाणी घेऊन जाणार नाही.” रमीज राजा यांनी म्हटले, “आशियाई क्रिकेट संघटनेने आम्हाला यजमानपद सांभाळण्याचा अधिकार दिला आहे. तरीदेखील भारत म्हणतो की आम्ही तिकडे येणार नाही. तर मी समजू शकतो त्यांचे काही राजकीय कारण असू शकते. पण आशिया चषक पाकिस्तानशिवाय कोणत्याही तटस्ठ ठिकाणी होणार नाही.”

रमीज राजा यांनी दिला भारताला इशारा

श्रीलंका आणि बांगलादेशनेही खेळण्यास नकार दिल्यास काय होईल असे एका पत्रकाराने विचारले तेव्हा रमीज राजा म्हणाले, “ पीसीबी भारताव्यतिरिक्त इतर संघांसोबत आशिया चषक आयोजित करू शकते का असे विचारले असता, रमीज राजा म्हणाले की, “आम्ही यजमान आहोत आणि आम्हाला हवे ते करू शकतो. पण आम्ही उपलब्ध आहोत, हा आमचा हक्क आहे. आम्हाला मिळालेल्या नाहीत अशा गोष्टी आम्ही मागत आहोत आणि आम्ही आग्रही आहोत.” यानंतर श्रीलंका आणि बांगलादेशनेही माघार घेतल्यास काय होईल, असा आक्षेप घेतल्यानंतर रमीज राजा यांनी आशिया चषक तटस्थ ठिकाणी हलवल्यास पाकिस्तान खेळणार नाही, असे उत्तर दिले. रमीज राजा म्हणाले, “भारतीय संघ आला नाही तर नको येऊदे. पण जर तो (आशिया चषक) बाहेर म्हणजे तटस्थ ठिकाणी झाला तर आम्ही खेळणार नाही.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramiz rajas new threat regarding asia cup pakistan will not play if played at neutral venue avw
First published on: 02-12-2022 at 19:14 IST