26 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाच्या स्पेन दौऱ्यासाठी, हॉकी इंडियाने 18 सदस्यीस भारतीय संघाची घोषणा केली आहे. अनुभवी खेळाडू राणी रामपालकडे पुन्हा एकदा भारतीय संघाचं नेतृत्व देण्यात आलं असून गोलकिपर सविता भारतीय संघाची उप-कर्णधार म्हणून काम पाहणार आहेत. या दौऱ्यात भारतीय महिला संघ स्पेनविरुद्ध 4 तर विश्वचषक उप-विजेत्या आयर्लंडविरुद्ध दोन सामने खेळणार आहे.

स्पेन दौऱ्यासाठी असा असेल भारताचा महिला हॉ़की संघ –

गोलकिपर – सविता, रजनी एटीमाप्रु

बचावफळी – रिना खोखर, दिप ग्रेस एक्का, सलिमा टेटे, निक्की प्रधान, गुरजीत कौर, सुशीला चानू

मधली फळी – लिलिमा मिन्झ, करिष्मा यादव, सोनिका, नेहा गोयल

आघाडीची फळी – राणी, वंदना कटारिया, नवनीत कौर, लारेमिसामी, उदीता, नवजोत कौर