scorecardresearch

रणजी करंडक २०१७ – पंकज जैसवालचा विक्रम, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद दुसरं अर्धशतक

धर्मशाळा मैदानात घडला विक्रम

अवघ्या १६ चेंडुंमध्ये झळकावलं अर्धशतक
रणजी करंडक स्पर्धेत हिमाचल प्रदेशच्या पंकज जैसवालने एक विक्रम आपल्या नावे केला आहे. ड गटात गोव्याविरुद्ध खेळताना धर्मशाळा शहरातील मैदानावर पंकजने प्रथमश्रेणी क्रिकेटमधलं सर्वात जलद दुसरं अर्धशतक ठोकलं. अवघ्या १६ चेंडुंमध्ये पंकज जैसवालने अर्धशतक झळकावलं. हिमाचल प्रदेशने आपला पहिला डाव ६२५ धावांवर घोषित केला, ज्यात जैसवाल ६३ धावांवर नाबाद राहिला.

अवघ्या २० चेंडुंमध्ये पंकजने ६३ धावांची खेळी केली. या खेळीत पंकजने ७ षटकार आणि ४ चौकार लगावले. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम जम्मू-काश्मीरच्या बनदीप सिंह याच्या नावावर आहे, २०१५ साली बनदीपने हा विक्रम केला आहे

अवश्य वाचा – बीसीसीआयने युवराज सिंहचं मानधन थकवलं! रक्कम माहितीये?

पहिल्यांदा फलंदाजी करणारा गोव्याच्या संघाचा डाव २५५ धावांवर आटोपला. या धावसंख्येचा पाठलाग करताना हिमाचल प्रदेशच्या अंकुश बैंस आणि पी.एस. खांडुरी यांनी शतकी खेळी केली. या खेळीमुळे हिमाचल प्रदेशने आपला पहिला डाव ६२५ धावांवर घोषित केला. मात्र दुसऱ्या डावात गोव्याच्या संघाने सामन्यात दमदार पुनरागमन केलं. सुमिरन आमोणकर आणि स्वप्नील आसनोडकर यांनी दुसऱ्या डावात शतकी खेळी करत आपल्या संघाचा पराभव टाळला. या सामन्यातून हिमाचल प्रदेशला ३ गुण मिळाले तर गोव्याला अवघ्या एका गुणावर समाधान मानावं लागलं.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranji trophy 2017 himachal pradesh pankaj jaiswal creats history by becoming second fastest player to make half century

ताज्या बातम्या