Assam Team withdraw appeal against Ajinkya Rahane : आसाम आणि मुंबई यांच्यात सुरू असलेल्या रणजी सामन्यादरम्यान, अजिंक्य रहाणेला त्याच्या १६ वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल आऊट देण्यात आले. मात्र, काही वेळाने आसाम संघाने अपील मागे घेतल्यानंतर रहाणेने पुन्हा फलंदाजी केली. एकेकाळी मुंबईचा संघ चार गडी गमावून १०२ धावा करून खेळत होता आणि रहाणेची वैयक्तिक धावसंख्या १८ धावा होती.

यानंतर त्याने चेंडू मिड-ऑनच्या दिशेने वळवून सिंगल घेण्याचा प्रयत्न केला पण त्याचा साथीदार शिवम दुबेने धाव घेण्यास नकार दिला. रहाणे बराच पुढे आला होता आणि आसामचा कर्णधार दानिश दासने चेंडू उचलून कीपरच्या दिशेने फेकला, पण तो क्रिझवर परतण्याचा प्रयत्न करणाऱ्या रहाणेला लागला. यानंतर आसामच्या सर्व खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल आऊटचे अपील केली आणि मैदानी पंचांनीही हे अपील मान्य केली.

IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Highlights Match in Marathi
LSG vs CSK Highlights, IPL 2024 : लखनऊचा चेन्नईवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय, राहुल-डी कॉकने झळकावले अर्धशतक
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनी कुठल्या दुखापतीसह खेळतोय? मुंबईविरूद्ध सामन्यानंतर सीएसकेच्या एरिक सिमन्स यांचे मोठे वक्तव्य
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: SRH चे फलंदाज ठरले फेल पण २० वर्षाच्या तरुणतुर्क शिलेदाराने सावरला संघाचा डाव, कोण आहे हा नितीश रेड्डी?

या निर्णयानंतर लगेचच पंचांनी चहाचा ब्रेकही जाहीर केला. आता आसामने पहिल्या डावात केलेल्या ८४ धावांना प्रत्युत्तर देताना मुंबईचे पाच फलंदाज केवळ १०५ धावांवर बाद झाले. मात्र, आसामने चहापानाच्या वेळी अपील मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि पंचांनाही याबाबत माहिती दिली.

हेही वाचा – Naushad Khan : आनंद महिंद्रांनी पुन्हा जिंकली सर्वांची मनं, सर्फराझ खानच्या वडिलांना खास ‘गिफ्ट’ देण्याची केली घोषणा

आऊट असूनही रहाणे पुन्हा फलंदाजीला आला –

नियमांनुसार, पुढील चेंडू टाकण्यापूर्वी बाद करण्याचे अपील मागे घ्यावे लागते आणि अंपायर जेव्हा ते स्वीकारतील तेव्हाच फलंदाज फलंदाजीला परत येऊ शकतो. सुदैवाने रहाणे बाद झाल्यानंतर चहापानाचा ब्रेक घेण्यात आला आणि त्याच दरम्यान आसाम संघाने आपला निर्णय बदलला. परिणामी, २० मिनिटांनी रहाणे पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात आला. मात्र, रहाणेला या जीवदानाचा फायदा उठवता आला नाही आणि केवळ चार धावा जोडल्यानंतर २२ धावांवर तो बाद झाला.

रहाणेने शिवम दुबेसोबत अर्धशतकी भागीदारी केली –

अजिंक्य रहाणे फलंदाजीला आला तेव्हा मुंबईचा संघ चार गडी गमावून ६० धावांवर खेळत होता. यानंतर रहाणेने शिवम दुबेसोबत अर्धशतकी भागीदारी केली. रहाणेचा आतापर्यंतचा रणजी हंगाम निराशाजनक राहिला असून त्याने आठ डावांत १६.०० च्या सरासरीने केवळ ११२ धावा केल्या आहेत. आसाम पहिल्या डावात केवळ ८४ धावांवर सर्वबाद झाला. दुखापतीनंतर पुनरागमन करताना शार्दुल ठाकूरने २१ धावांत सहा बळी घेतले आणि आसामची संपूर्ण फलंदाजी उद्ध्वस्त केली.