scorecardresearch

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : बावणेच्या शतकामुळे महाराष्ट्र ४ बाद २९८

राहुलने ९ चौकार आणि एका षटकारासह ५६ धावांची खेळी साकारताना दांडेकरसह दुसऱ्या गडय़ासाठी ४८ आणि बावणेच्या साथीने तिसऱ्या गडय़ासाठी ४१ धावांची भागीदारी केली.

कर्णधार अंकित बावणेच्या शानदार नाबाद शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने गुरुवारी उत्तर प्रदेशविरुद्धच्या ग-गटातील रणजी करंडक लढतीत ४ बाद २९८ अशी दमदार मजल मारली.

गुरुग्राम क्रिकेट मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्यावर महाराष्ट्राने सलामीवीर पवन शाहला (१९) आणि अवधूत दांडेकर (२०) यांना लवकर गमावले. परंतु राहुलने ९ चौकार आणि एका षटकारासह ५६ धावांची खेळी साकारताना दांडेकरसह दुसऱ्या गडय़ासाठी ४८ आणि बावणेच्या साथीने तिसऱ्या गडय़ासाठी ४१ धावांची भागीदारी केली. राहुल बाद झाल्यावर बावणेने नौशाद शेखच्या (५३) साथीने चौथ्या गडय़ासाठी ९९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. खेळ थांबला, तेव्हा बावणे २११ चेंडूंत १८ चौकारांसह ११४ धावांवर, तर अझिम काझी ३३ धावांवर खेळत आहे. उत्तर प्रदेशकडून अंकित रजपूत, शिवम शर्मा, धनखड, करण शर्माने प्रत्येकी एक बळी मिळवला.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र : ८९ षटकांत ४ बाद २९८ (अंकित बावणे नाबाद ११४, राहुल त्रिपाठी ५६; जसमेर धनखड १/४९)

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranji trophy cricket tournament ankit bawane century maharashtra lead akp

ताज्या बातम्या