पीटीआय, मुंबई
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील बाद फेरीचे सामने बंगळूरुत खेळवण्यात येणार आहेत. यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना ४ जूनपासून प्रारंभ होणार असून, मुंबईची उत्तराखंडशी गाठ पडणार आहे.
सध्या चालू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या आधी रणजी स्पर्धेतील साखळी सामने झाले;
परंतु ‘आयपीएल’नंतर बाद फेरी होणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पर्धेचा कार्यक्रम आखतानाच स्पष्ट केले होते.
रणजी स्पर्धेसाठी खेळाडूंना अनिवार्य विलगीकरण नसेल; परंतु जैव-सुरक्षा परिघाची निर्मिती केली जाईल. स्पर्धास्थळी दाखल झाल्यानंतर सर्व संघांना आपल्या खेळाडूंच्या करोना आरटी-पीसीआर चाचण्यांचे अहवाल सादर करावे लागतील.
उपांत्यपूर्व फेरीचे चार सामने ४ ते ८ जून या कालावधीत होणार आहेत. याचप्रमाणे बंगाल वि. झारखंड, कर्नाटक वि. उत्तर प्रदेश आणि पंजाब वि. मध्य प्रदेश अशा अन्य तीन उपांत्यपूर्व लढतीत होतील. त्यानंतर १२ ते १६ जून या दरम्यान उपांत्य सामने होतील, तर २० ते २४ जून या कालावधीत अंतिम सामना होईल.
बाद फेरीचा कार्यक्रम
उपांत्यपूर्व फेरी
४ ते ८ जून
बंगाल वि. झारखंड
मुंबई वि. उत्तराखंड
कर्नाटक वि. उत्तर प्रदेश
पंजाब वि. मध्य प्रदेश
उपांत्य फेरी
१२ ते १६ जून
२० ते २४ जून