scorecardresearch

Premium

Ranji Trophy Final 2022 : ‘रणजी रनमशीन’ सर्फराज खानचे शानदार शतक, अनोख्या पद्धतीने साजरा केला आनंद

रणजीच्या अंतिम सामन्यात शतक पूर्ण करताना मुंबईचा फलंदाज सर्फराज खान भावूक झाला होता.

Sarfaraz Khan
फोटो सौजन्य – बीसीसीआय ट्विटर

MUM vs MP Ranji Trophy final : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रणजीचा अंतिम सामना खेळवला जात आहे. देशांतर्ग क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्यात मुंबई आणि मध्य प्रदेश एकमेकांशी दोन हात करत आहेत. मुंबई आपले ४२वे विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक आहे तर मध्य प्रदेशचा संघ २३ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी मैदानात उतरला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सर्फराज खानने या हंगामातील चौथे शतक पूर्ण केले आहे. अंतिम सामन्यात शतक साजरे केल्यानंतर सर्फराजने अनोख्या अंदाजात आनंद साजरा केला.

रणजीच्या अंतिम सामन्यात शतक पूर्ण करताना मुंबईचा फलंदाज सर्फराज खान भावूक झाला होता. शतक साजरे करताना २३ वर्षीय फलंदाज हेल्मेट काढताना रडताना दिसला. त्यानंतर त्याने शिखर धवन-स्टाईलने शड्डू ठोकून आनंद साजरा केला. या वर्षाच्या रणजी हंगामातील हे त्याचे चौथे आणि प्रथम श्रेणीतील आठवे शतक ठरले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सर्फराजने शतक पूर्ण केलेल्या क्षणाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

England vs New Zealand Oneday Cricket World Cup 2023
World Cup 2023: इंग्लंडच्या संघाने केला विश्वविक्रम! वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यादाच झाली ‘या’ खास पराक्रमाची नोंद
A stunning comeback Shreyas Iyer's amazing catch by Shaun Abbott and the umpire gives not out Watch the video
IND vs AUS 2nd ODI: जबरदस्त पुनरागमन! श्रेयस अय्यरचा शॉन अ‍ॅबॉटने पकडला अप्रतिम झेल अन् अंपायरने दिले नॉटआऊट; पाहा Video
Suryakumar Yadav's luck will change in one innings Shreyas Iyer's position from World Cup playing XI in danger zone
IND vs AUS: ‘मिस्टर ३६०’ फॉर्ममध्ये परतला, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमारने झळकावले तिसरे अर्धशतक; श्रेयस अय्यरचे स्थान धोक्यात
Pat Cummins Reaction After Defeat
IND vs AUS : ‘वैयक्तिकरित्या मी आनंदी आहे…’; भारताविरुद्धच्या पराभवानंतर पॅट कमिन्स असं का म्हणाला? जाणून घ्या

सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर सर्फराज ४० धावांवर नाबाद होता. दुसऱ्या दिवशी डावाची सुरुवात केल्यानंतर त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यासाठी त्याने १५२ चेंडू घेतले. या दरम्यान मुंबईच्या फलंदाजीची पडझड सुरू होती. त्यामुळे संघाला चांगल्या स्थितीत पोहचवण्यासाठी सर्फराजने आपल्या खेळाची गती वाढवली. त्याने अवघ्या ३८ चेंडूंत पुढील पन्नास धावांचा टप्पा पार करून शतक साजरे केले.

हेही वाचा – Rohit Sharma Emotional Note : ‘या’ कारणामुळे रोहित शर्माने चाहत्यांसाठी लिहिली भावनिक पोस्ट

मुंबईचा फलंदाज सर्फराज खान यंदाच्या रणजी करंडकामध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने या वर्षीच्या रणजी करंडक स्पर्धेतील शेवटच्या तीन साखळी सामन्यांमध्ये १६५, ६३, ४८ अशा केल्या होत्या. शिवाय, मुंबई विरुद्ध उत्तराखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यातही त्याने १५४ धावा केल्या होत्या. गेल्या रणजी हंगामात त्याने एकूण ९२८ धावा केल्या होत्या. प्रत्‍येक प्रथम श्रेणीतील शतकामध्ये १५० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. या हंगामामध्येदेखील सातत्यपूर्ण कामगिरी करत आपली क्षमता सिद्ध करून दाखवली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranji trophy final 2022 mumbai batter sarfaraz khan celebrates his century with thigh five and tears of joy vkk

First published on: 23-06-2022 at 13:33 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×