scorecardresearch

तामिळनाडूची मजबूत पकड

संधीचा फायदा उचलण्यात महाराष्ट्राला अपयश आल्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत तामिळनाडूने धावांचा डोंगर उभा केला़ दिनेश कार्तिक (११३) आणि विजय शंकर (९१) या जोडीने चिवट खेळ करून महाराष्ट्राच्या गोलंदाजांचा थकवल़े.

संधीचा फायदा उचलण्यात महाराष्ट्राला अपयश आल्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत तामिळनाडूने धावांचा डोंगर उभा केला़  दिनेश कार्तिक (११३) आणि विजय शंकर (९१) या जोडीने चिवट खेळ करून महाराष्ट्राच्या गोलंदाजांचा थकवल़े  या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १९०धावांची भागीदारी करून संघाची मजबूत पायाभरणी केली. त्यावर धावांचा डोंगर चढवला तो रामास्वामी प्रसन्ना (नाबाद ६४) आणि बाबा इंद्रजीत (नाबाद ६८) या जोडीऩे  त्यांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद १०७ धावांची भागीदारी करून दुसऱ्या दिवसअखेर संघाला ५ बाद ४२६ धावा अशा मजबूत स्थितीत आणल़े
तामिळनाडूच्या फलंदाजांचा मारा आणि त्यात उष्ण वातावरणाने हैराण झालेल्या महाराष्ट्राच्या कर्णधार रोहित मोटवानीने आठ गोलंदाजांना पाचारण केल़े  मात्र, त्यांना केवळ दोन फलंदाजांना बाद करण्यात यश मिळाल़े  नाबाद ४८ धावांवरून गुरुवारी खेळाची सुरुवात करणाऱ्या दिनेश कार्तिकने संयमी खेळ केला़ त्याने  साडेसात तास फलंदाजी करून ३०४ चेंडूंत १६ चौकारांच्या मदतीने ११३ धावा चोपल्या़  कार्तिकला श्रीकांत मुंडे याने यष्टीरक्षक मोटवानीकरवी झेलबाद केल़े
तत्पूर्वी़, १९४ चेंडूंत ११ चौकार व १ षटकार खेचून ९१ धावा करणाऱ्या शंकरला चिराग खुराणाने माघारी धाडले होत़े  ३ बाद ९० अशा अवस्थेतून या जोडीने संघाला ५ बाद ३१९ धावांची मजल मारून दिली़  ही जोडी माघारी परतल्यानंतर प्रसन्ना व इंद्रजीत यांनी संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली़  विदर्भविरुद्ध १११ व ४९ धावा करणाऱ्या इंद्रजीतने याही लढतीत आपला फॉर्म कायम राखून अर्धशतक झळकावल़े  इंद्रजीतने १२० चेंडूंत ११ चौकारासह नाबाद ६८ धावा केल्या, तर प्रसन्नाने १७५ चेंडूंत १० चौकार मारत नाबाद ६४ धावा केल्या़

*१९० धावा दिनेश कार्तिक आणि विजय शंकर या जोडीने चौथ्या विकेटसाठी चोपून तामिळनाडूचा डाव सावरला़  दोघांच्या या महत्वपूर्ण खेळीच्या बळावर ३ बाद ९० धावा अशा दयनीय अवस्थेतून संघ बाहेर पडला़

*२२ वे प्रथम श्रेणीतील शतक दिनेश कार्तिकने या लढतीत झळकावल़े

*१०७ धावांची भागीदारी रामास्वामी प्रसन्ना (नाबाद ६४) आणि बाबा इंद्रजीत (नाबाद ६८) या जोडीने सहाव्या विकेटसाठी  केली़

संक्षिप्त धावफलक
तामिळनाडू (पहिला डाव) : ५ बाद ४२६ धावा (दिनेश कार्तिक ११३, विजय शंकर ९१, बाबा इंद्रजीत नाबाद ६८, आर. प्रसन्ना नाबाद ६४) विरुद्ध महाराष्ट्र.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranji trophy karthik shankar keep tamil nadu steady