scorecardresearch

Ranji Trophy: केदार जाधवची रणजी ट्रॉफीमध्ये वादळी खेळी! क्रिकेटपासून १२ महिने दूर, ७ डावात ठोकल्या ५९६ धावा

क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर केदार जाधवने आतापर्यंत एक द्विशतक, एक शतक आणि २ अर्धशतकं झळकावली आहेत. त्याने आतापर्यंत ७ डावात ५९६ धावा केल्या आहेत.

Ranji Trophy: Kedar Jadhav storms in Ranji Trophy 12 months away from cricket scored 596 runs in 7 innings
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

Kedar Jadhav Ranji Trophy: ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ अशी म्हण केदार जाधवला नक्कीच लागू पडते रणजी ट्रॉफी २०२३च्या हंगामात त्याने अक्षरशः कमाल केली. सात डावात तब्बल ५९६ धावा काढत त्याने ipl फ्रँचायझींसह बीसीसीआयला देखील विचार करायला भाग पाडले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने आपला ठसा उमटवला आहे. सध्या त्याची बॅट आग ओकत असून गोलंदाजांना फटके पडत आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. वास्तविक, तो बऱ्याच दिवसांनी क्रिकेटमध्ये पुनरागमन करून हे करत असल्याचे दिसत आहे.

केदार जाधवच्या बॅटची लेटेस्ट शानदार खेळी रणजी ट्रॉफी सामन्यामध्ये पाहायला मिळाली. महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात महाराष्ट्राकडून खेळताना केदार जाधवने जबरदस्त शतक झळकावले. त्याने महाराष्ट्राच्या पहिल्या डावात १६८ चेंडूंचा सामना करत १२८ धावा केल्या. हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १५वे शतक आहे.

हेही वाचा: बहुत याराना लगता है! जेव्हा हार्दिक-धोनी बनतात ‘जय-वीरू’ तेव्हा…, रांचीला पोहोचल्यावर विंटेज बाईकवर काढले फोटो

केदार जाधवने अवघड परिस्थितीत शतक झळकावले

केदार जाधवच्या मुंबईविरुद्धच्या शतकी खेळीबाबत आणखी एक गोष्ट समोर आली. महाराष्ट्र संकटात सापडला असताना त्याने हे शतक ठोकले. त्याचे २ गडी अवघ्या २३ धावांत बाद झाले. पण, त्यानंतर त्याने केवळ स्वत:ला खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळ दिला नाही, तर एकदा पाय रोवले की, त्यानंतर त्याने काय केले, हेही सर्वांनी पाहिले.

क्रिकेटपासून १२ महिने दूर, तरीही अंदाज मात्र कायम

केदार जाधवचा फॉर्म आणि तंदुरुस्तीवर नेहमीच प्रश्नचिन्ह राहिले आहे. याच कारणामुळे त्याला वर्षभर क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावे लागले. केदारने परत येण्यापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये तो फक्त रणजी ट्रॉफी सामन्यातून परतला. पहिल्या दोन सामन्यात त्याच्या बॅटमधून फक्त ४३ धावा आल्या. पण पुढच्या ५ डावात त्याने धावांचा डोंगर उभा केला.

हेही वाचा: ICC ODI Rankings: icc क्रमवारीत शुबमन गिलची हनुमान उडी! विराट कोहली-रोहित शर्माला टाकले मागे

७ डावात ५९६ धावा केल्या

केदार जाधवने पुढच्या ५ डावांपैकी ४ डावात एक द्विशतक, एक शतक आणि २ अर्धशतके झळकावली आहेत. या शानदार कामगिरीच्या जोरावर केदार जाधवने आतापर्यंत केवळ ७ डावात ५९६ धावा केल्या आहेत. १२ महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर त्याने या धावा केल्या, हा देखील त्याच्या फॉर्ममध्ये असल्याचा पुरावा आहे. याशिवाय, सलमानचा हा चाहता वयाच्या ३७ व्या वर्षीही फिट आहे, तरच तो हिटही आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 12:51 IST