मुंबई : पहिल्या डावातील मोठय़ा पिछाडीनंतर तमिळनाडूला मुंबईविरुद्ध रणजी करंडक स्पर्धेतील सामन्याच्या दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन करण्यात यश आले. तमिळनाडूची तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ४ बाद ३८० अशी धावसंख्या होती. त्यांच्याकडे ४३ धावांची आघाडी होती.

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेल्या या ब-गटाच्या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात ३३७ धावांची आघाडी मिळवली होती. त्यामुळे तमिळनाडूच्या फलंदाजांवर दडपण होते. तमिळनाडूची दुसऱ्या दिवसअखेर १ बाद ६२ अशी स्थिती होती. तिसऱ्या दिवशी तमिळनाडूने बाबा अपराजित (२२) आणि साई सुदर्शन (६८) यांना गमावले. त्यानंतर प्रदोष रंजन पॉल (१८७ चेंडूंत नाबाद १०७) आणि कर्णधार बाबा इंद्रजित (१५९ चेंडूंत १०३) यांनी तमिळनाडूच्या डावाला आकार दिला. या दोघांनी झुंजार फलंदाजी करताना चौथ्या गडय़ासाठी १३१ धावांची भागीदारी रचली. मुंबईचे गोलंदाज या दोघांना अडचणीत टाकण्यात अपयशी ठरले.

Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
List of Mahendra Singh Dhoni's records
DC vs CSK : माहीने दिल्लीविरुद्ध दमदार फटकेबाजी करत लावली विक्रमांची रांग, पाहा संपूर्ण यादी
Kwena Maphaka has recorded embarrassing record in IPL 2024
IPL 2024 : हैदराबादविरुद्धच्या सामन्यात वर्ल्डकप गाजवणाऱ्या मुंबईच्या गोलंदाजाची धुलाई; नावावर नोंदला गेला नकोसा विक्रम

मुंबईचा डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानीने इंद्रजितला माघारी पाठवत ही जोडी फोडली. परंतु दुसऱ्या बाजूने प्रदोषने अप्रतिम फलंदाजी सुरू ठेवली. त्याने पाचव्या गडय़ासाठी अनुभवी विजय शंकर (६७ चेंडूंत ४३) याच्यासह ९९ धावांची अभेद्य भागीदारी रचली आहे.