Ratan Tata and Sachin Tendulkar Meet Viral photo: भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली असून, प्रत्येकजण त्यांच्याबरोबर घालवलेले क्षण आणि अनुभव शेअर करून त्यांना आदरांजली वाहत आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही रतन टाटा यांची भेटीचा अनुभव सांगत त्यांना आदरांजली वाहिली आहे. रतन टाटा यांना भेटणे किती खास होते हे त्यांनी सांगितले होते. रतन टाटा यांच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरने त्यांच्या घरी पोहोचून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना सचिन तेंडुलकरने त्यांच्या भेटीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात त्यांनी लिहिले की, “रतन टाटा यांनी आयुष्यभर देशाचाच विचार केला. त्यांच्या जाण्याने समस्त देशवासीय शोकाकुल झाले. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो की, मला त्यांच्याबरोबर वेळ व्यतित करता आला. पण लाखो लोक, ज्यांनी त्यांना कधीच पाहिले नाही, त्यांनाही आज माझ्याइतकंच दु:ख, वेदना वाटत आहेत. हा रतन टाटा यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आहे.”
“प्राण्यांवरील त्यांच प्रेम ते त्यांच्या परोपकारापर्यंत, त्यांनी हे दाखवून दिले की खरी प्रगती तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण अशा काहींची काळजी घेतो, ज्यांच्याकडे स्वतःची काळजी घेण्याचे साधन नाही. तुमच्या आत्म्याला शांती लाभो, तुमचा वारसा तुम्ही स्थापन केलेल्या संस्था आणि मूल्यांच्या आधारे कायम पुढे जात राहील.”
हेही वाचा – Ratan Tata Death: “भारताने खरं रत्न गमावलं…”, सेहवागने रतन टाटा यांना आदरांजली वाहत शेअर केली भावुक पोस्ट
मे २०२४ मध्ये सचिन तेंडुलकरने रतन टाटा यांची भेट घेतली होती आणि या भेटीचा फोटो आणि त्यांनी केलेली चर्चा याबद्दल सचिन तेंडुलकरने पोस्ट शेअर करत सांगितले होते. सचिनने २१ मे रोजी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “हा संस्मरणीय रविवार होता. रतन टाटा यांच्याबरोबर वेळ घालवण्याची मला संधी मिळाली.”
सचिनने शेअर केलेल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, “ऑटोमोबाईल या आमच्या जिव्हाळ्याच्या विषयावर आम्ही चर्चा केली. समाजाला परत देण्याची आमची बांधिलकी, प्राण्यांबद्दलचे आमचे प्रेम आणि कुत्र्याप्रति प्रेम याबद्दल आम्ही एकमेकांशी गप्पा मारल्या. अशा चर्चा अमूल्य आहेत. हा एक दिवस आहे जो मी हसतमुखाने कायम स्मरणात ठेवेन.