scorecardresearch

Premium

WTC फायनलमध्ये कोणत्या विकेटकीपरची होणार निवड? किशन आणि भरतसाठी ‘या’ फॉर्म्युल्याचा वापर करणार, रवी शास्त्री म्हणाले…

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडनने म्हटलं आहे की, ईशान किशनला मैदानात उतरवणे योग्य ठरेल. अशातच आता रवी शास्त्री यांनीही यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

WTC Final 2023 Latest News update
रवी शास्त्री यांनी के एस भरत आणि ईशान किशनवर मोठी प्रतिक्रिया दिलीय. (Image-Indian Express)

Ravi Shastri On Ishan Kishan And K S Bharat : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यासाठी टीम इंडियाने जोरदार तयारी सुरु केली आहे. नेटमध्ये सराव करताना कोणता खेळाडू चमकदार कामगिरी करतो, याचा अभ्यास केल्यानंतर टीम इंडिया विकेटकीपर म्हणून इशान किशनला सामील करण्याच्या विचारात आहे. परंतु, नेटमध्ये काहीतरी वेगळं दाखवलं जातं आणि संघ निवडीच्या वेळी काहीतरी वेगळं घडतं. त्यामुळे टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हन मध्ये के एस भरतची निवड होणार की ईशान किशनला संधी मिळणार? याबाबत जाहीरपणे सांगता येणार नाही. परंतु, दिग्गजांकडून याबाबत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडनने म्हटलं आहे की, ईशान किशनला मैदानात उतरवणे योग्य ठरेल. अशातच आता रवी शास्त्री यांनीही यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटलं की, आता तुम्ही डब्ल्यूटीसी फायनलकडे बघत असाल आणि जर मी भारताच्या शेवटच्या फायनलकडे पाहत असेल, तर तुम्ही मागील सामन्यातून काय शिकलात हे पाहणंही महत्वाचं ठरतं. अशातच तुम्हाला असा एक संघ निवडावा लागतो जो परिस्थितीशी अनुकूल असेल. मागील सामन्यात साउथंप्टनमध्ये हवामान अनुकूल नव्हतं. आता यावेळी मी माझ्या प्लेईंग ११ मध्ये रोहित, गिल, पुजारा, कोहली आणि नंबर पाचसाठी अजिंक्य रहाणेला निवडणं आवडेल.

Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?
jansatta-bhupesh-baghel-interview
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची द इंडियन एक्स्प्रेस ऑनलाईन मीडिया समिटच्या रायपूरमधील ‘मंथन’ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती!

नक्की वाचा – Asia Cup 2023 : एसीसीने पाकिस्तानला दिला झटका! एशिया कपसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मोठा निर्णय घेण्याची शक्यता

शास्त्री पुढे म्हणाले की, आता के एस भरत आणि ईशान किशन यांच्यात सामना सुरु आहे. मला असं वाटतं की, ते कोणत्या खेळाडूला खेळवणार आहेत. जर दोन स्पिनर खेळणार असतील, तर किपर के एस भरत असू शकतो. परंतु, टीम इंडिया जर चार पेसर आणि एक स्पिनरला खेळवणार असतील, अशावेळी ईशान किशनला खेळवणं योग्य ठरेल. नंबर सहावर रविंद्र जडेजा आणि सातवर मोहम्मद शमीचं नाव असेल. तसचं नंबर आठवर मोहम्मद सिराज आणि नवव्या क्रमांकावर शार्दुल ठाकूर असेल. याशिवाय इतर दोन खेळाडू रविचंद्रन आश्विन आणि उमेश यादव आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ravi shastri gives big statement on ishan kishan and ks bharat wicketkeeping ahead of wtc final 2023 know about team india playing eleven nss

First published on: 02-06-2023 at 19:05 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×