अन्वय सावंत, लोकसत्ता

मुंबई : आव्हाने स्वीकारणे, अपयशातून धडे घेणे आणि कधीही हार न मानणे हे मुंबईकरांचे विशेष गुण आहेत. क्रिकेटच्या मैदानावरही हेच गुण मुंबईला इतर संघांपेक्षा वेगळे बनवतात, असे मत भारत व मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. शुक्रवारी वांद्रे कुर्ला संकुल येथील ‘एमसीए’ शरद पवार क्रिकेट अकादमी मैदानावर झालेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या वार्षिक पुरस्कार समारंभात शास्त्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. २०१६-१७ हंगामापासूनच्या पुरस्कारांचे या समारंभात वितरण करण्यात आले. या समारंभास ‘बीसीसीआय’चे कोषाध्यक्ष आशीष शेलारही उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे ‘एमसीए’ अध्यक्ष अमोल काळे यांनी स्वागत केले.

MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
maharashtra animal husbandry commissioner kaustubh diwegaonkar talking about survival of the fittest
माझी स्पर्धा परीक्षा : समाज म्हणून यशाच्या व्याख्या बदलायला हव्यात

‘‘मी मुंबईतील मैदानांवरून पुढे आलो. क्रिकेटमध्ये असो किंवा आयुष्यात, यश मिळवण्यासाठी कोणतीही पळवाट नाही, हे मुंबई तुम्हाला शिकवते. पहाटे उठून रेल्वेच्या गर्दीत प्रवास करून आझाद मैदान किंवा क्रॉस मैदान गाठणे, क्रिकेटचा सराव करणे, तेथून शाळेत जाणे आणि मग पुन्हा क्रिकेटचा सराव करणे ही सर्व मेहनत तुम्हाला खूप काही शिकवते. मी स्वत: या गोष्टी केल्या होत्या. या मेहनतीनंतर, संयम बाळगल्यानंतर मिळणारे यश खूप खास असते,’’ असे शास्त्री म्हणाले.

‘‘मुंबईत गुणवान क्रिकेटपटूंची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक सराव सत्रात, सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणे गरजेचे असते. तुम्ही चांगला खेळ न केल्यास तुमचे स्थान घेण्यासाठी अनेक उत्तम पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे मुंबईतील क्रिकेट प्रत्येक परिस्थितीत १०० टक्के देण्यास शिकवते,’’ असेही शास्त्री यांनी सांगितले.

‘‘वेगळे काही तरी करून दाखवण्याची जिद्द तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवते. कोणतेही आव्हान स्वीकारणे आणि अपयशाला न घाबरणे या गोष्टी मुंबईकरांना खास बनवतात. माझी आव्हाने स्वीकारण्याची तयारी नसती, तर मी भारतासाठी कधीही सलामीवीर म्हणून खेळण्यास होकार दिला नसता. प्रत्येक आव्हानाकडे संधीप्रमाणे पाहिले पाहिजे. अपयश येणारच. मात्र, त्यातून शिकणे गरजेचे आहे. कोणतीही गोष्ट अशक्य नाही. भारतासाठी सलामी करणे, ब्रिस्बेन येथे कसोटी सामना जिंकणे, विश्वचषक जिंकणे यापैकी काहीही अशक्य नाही. तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे,’’ असेही शास्त्री यांनी नमूद केले.

श्रेयसची पाच पुरस्कारांवर मोहोर

भारत आणि मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यरने ‘एमसीए’च्या पाच पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. यात सर्वोत्तम रणजीपटू (२०१६-१७) आणि सर्वोत्तम क्रिकेटपटू (२०१८-१९) या पुरस्कारांचा समावेश होता.

पद्माकर शिवलकर यांना जीवनगौरव

मुंबईचे माजी दिग्गज डावखुरे फिरकीपटू पद्माकर शिवलकर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यांनी १२४ प्रथम श्रेणी सामन्यांत ५८९ गडी बाद केले होते.

विविध पुरस्कार विजेते खेळाडू

रणजी मोसमात सर्वाधिक धावा : श्रेयस अय्यर (२०१६-१७), सिद्धेश लाड (२०१७-१८, २०१८-१९), सर्फराज खान (२०१९-२०, २०२१-२२).

सर्वोत्तम रणजी क्रिकेटपटू : श्रेयस अय्यर (२०१६-१७), पृथ्वी शॉ (२०१७-१८), शिवम दुबे (२०१८-१९), सर्फराज खान (२०१९-२०, २०२१-२२).

रणजी स्पर्धेतील वेगवान शतक : पृथ्वी शॉ (२०१६-१७), श्रेयस अय्यर (२०१७-१८, २०१८-१९), सर्फराज खान (२०२१-२२), सूर्यकुमार यादव (२०१९-२०).

’सर्वोत्तम वरिष्ठ क्रिकेटपटू : अभिषेक नायर (२०१६-१७), सिद्धेश लाड (२०१७-१८), श्रेयस अय्यर (२०१८-१९), शम्स मुलानी (२०१९-२०, २०२१-२२).

रणजी स्पर्धेत सर्वाधिक बळी : शार्दूल ठाकूर व विजय गोहिल (२०१६-१७), धवल कुलकर्णी (२०१७-१८), शिवम दुबे (२०१८-१९), शम्स मुलानी (२०१९-२०, २०२१-२२). 

२३ वर्षांखालील सर्वोत्तम : साईराज पाटील (२०१६-१७), अक्षय सरदेसाई (२०१७-१८), मिनाद मांजरेकर (२०१९-२०), सुवेद पारकर (२०२१-२२),

१९ वर्षांखालील सर्वोत्तम क्रिकेटपटू : अरमान जाफर (२०१६-१७), सुवेद पारकर (२०१७-१८), यशस्वी जैस्वाल (२०१८-१९), प्रग्नेश कानपिल्लेवार (२०१९-२०),

१९ वर्षांखालील सर्वोत्तम गोलंदाज : मिनाद मांजरेकर (२०१६-१७), अर्जुन तेंडुलकर (२०१७-१८, २०१८-१९), धानित राऊत (२०१९-२०), मुशीर खान (२०२१-२२), प्रिन्स बदियानी (२०२१-२२)

१६ वर्षांखालील सर्वोत्तम क्रिकेटपटू : सुवेद पारकर तसेच विघ्नेश सोळंकी (२०१६-१७), यशस्वी जैस्वाल व प्रग्नेश कानपिल्लेवार (२०१७-१८), हिमांशु सिंग व सूर्याश शेडगे (२०१८-१९), आयुष जेठवा व मुशीर खान (२०१९-२०). 

’१४ वर्षांखालील सर्वोत्तम क्रिकेटपटू : शंतनू कदम (२०१६-१७), वेदांत गाडिया (२०१७-१८), अनुराग सिंग (२०१८-१९), अवेश खान (२०१९-२०).

सर्वोत्तम कनिष्ठ क्रिकेटपटू : सुवेद पारकर (२०१७-१८), आयुष जेठवा (२०१८-१९), प्रग्नेश कानपिल्लेवार (२०१९-२०), अंगक्रिश रघुवंशी (२०२१-२२).

विशेष पुरस्कार : सुवेद पारकर (रणजी पदार्पणात द्विशतक, २०२१-२२)

सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू : सुलक्षणा नाईक (२०१६-१७), हेमाली बोरवणकर (२०१७-१८), जेमिमा रॉड्रिग्ज (२०१८-१९), वृषाली भगत (२०१९-२०), हुमेरा काझी (२०२१-२२)

सर्वोत्तम कनिष्ठ महिला क्रिकेटपटू : फातिमा जाफर (२०१६-१७), जेमिमा रॉड्रिग्ज (२०१७-१८), सायली सातघरे (२०१८-१९), आचल वालांजु (२०१९-२०).