भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयपीएलबाबत एक मोठं विधान केले आहे. एकाच वर्षात दोनदा आयपीएस स्पर्धा खेळवल्यास मला आर्श्चय वाटणार नाही, असं ते म्हणाले. सद्यस्थितीत ज्या फॉरमॅटमध्ये आयपीएल खेळवलं जात आहे. त्याचप्रमाणे आणखी संघ आणि सामन्यांची संख्या वाढवून ही स्पर्धा खेळवली जाऊ शकते, असेही ते म्हणाले. वॉनी आणि टफर्स क्रिकेट क्लब पॉडकास्ट कार्यक्रमात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“मला वाटते की आपल्याकडे दोन आयपीएलचे हंगाम असायला हवे. असे झाल्यास मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने कमी करून वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये आयपीएलचा एक छोटा हंगाम आयोजित केला जाऊ शकतो.”, अशी प्रतिक्रिया शास्री यांनी दिली आहे.

हेही वाचा – IPL मधल्या टीमचे मालक जगभरात टीम विकत घेतायत हे धोकादायक; अ‍ॅडम गिलख्रिस्टचा इशारा

ते पुढे म्हणाले, “आयपीएलमध्ये भविष्यात संघांची संख्या वाढू शकते. तसेच आयपीएलचा एक हंगाम दीड ते दोन महिन्यांचा होऊ शकतो. ही स्पर्धा भारतीय क्रिकेटसाठी अतिशय चांगली आहे. खेळाडूंसह प्रसारक आणि विविध संघांसोबत करणाऱ्यांसाठी हे एक चांगले उत्पन्नाचे साधन आहे.”

हेही वाचा – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : कामगिरी उंचावण्याचे भारतासमोर आव्हान ; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सामन्यांची संख्या वाढल्याचे कारण देत बेन स्टोक्सने एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे आयसीसीचे वेळापत्रक चर्चेत आले होते. यासंदर्भात बोलताना, द्विपक्षीय टी-२० मालिका खेळवणे बंद करायला पाहिजे, असेही ते म्हणाले.