किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व रविचंद्रन अश्विनकडे

या संघात युवराज सिंग आणि ख्रिस गेलसारख्या मातब्बर खेळाडूंचा समावेश आहे.

आगामी इंडियन प्रीमियर लीगकरिता (आयपीएल) किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनकडे सोपवण्यात आले आहे. या संघात युवराज सिंग आणि ख्रिस गेलसारख्या मातब्बर खेळाडूंचा समावेश आहे.

आयपीएलच्या आठ हंगामांमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या दोन विजेतेपदांमध्ये अश्विनचा सिंहाचा वाटा होता. याशिवाय एक हंगाम तो पुणे सुपरजायंट्सकडून खेळला. या जबाबदारीविषयी तो म्हणाला, ‘‘गुणी खेळाडूंच्या संघाचे नेतृत्व मिळणे, हा एक प्रकारचा सन्मान असतो. येत्या आयपीएल हंगामात आम्ही सर्वोत्तम कामगिरी बजावू, याची खात्री आहे. हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे.’’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ravichandran ashwin captain of kings xi punjab in ipl