Ravindra Jadeja Clean Bowled Aiden Markram Video: गुवाहाटी कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ मजबूत स्थितीत आहे. चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात द. आफ्रिका चांगली फलंदाजी करत आहे. तर भारताचे फिरकीपटूही द. आफ्रिकेच्या फलंदाजांना त्रास देताना दिसत आहे. रवींद्र जडेजाने द. आफ्रिकेच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केलं. यादरम्यान त्याने मारक्रमला क्लीन बोल्ड केलं, ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात ३ विकेट्स गमावत १०७ धावा केल्या आहेत. यासह संघाची आघाडी आता ३९५ धावांवर जाऊन पोहोचली आहे. आफ्रिकेकडून टॉनी दी जॉर्जी व ट्रिस्टन स्टब्स शानदार फलंदाजी करत आहेत. रिकल्टन व मारक्रम याी ५९ धावांची भागीदारी करत संघाला दुसऱ्या डावात चांगली सुरूवात करून दिली.

रवींद्र जडेजाने चौथ्या दिवशी सुरूवातीला रिकल्टनला झेलबाद केला. सिराजने कमालीचा झेल टिपल्यानंतर रिकल्टन ३५ धावांवर बाद झाला. यानंतर जडेजाने २९व्या षटकातील पहिलाच चेंडू इतक्या कमाल लाईन लेंग्थसह टाकला, जो थेट स्टंप्सवर जाऊन आदळला. मारक्रम जड्डूने टाकलेला चेंडू खेळायला चुकला आणि स्टंप्सवर आदळत क्लीन बोल्ड झाला. बेल्स उडून पंतच्या हेल्मेटवर लागले इतका कमाल चेंडू होता. रवींद्र जडेजाने घेतलेल्या या विकेटचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.