IPL 2026 Ravindra Jadeja Gun Shot Celebration Video: चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२६ मधील पहिलाच सामना खेळवला जात आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजीसमोर गुडघे टेकले आहेत. नांद्रे बर्गरने संजू सॅमसनला बाद करत पहिली विकेट मिळवून दिली आणि त्यानंतर सर्व गोलंदाजांनी एकामागून एक विकेट्स घेत चेन्नईच्या धावांना ब्रेक लावला. यानंतर जडेजाने घेतलेल्या विकेटनंतर केलेल्या सेलिब्रेशनचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत चेन्नईला फलंदाजीसाठी पाचारण केलं. पाऊस पडून गेल्यानंतर नाणेफेक पाच मिनिटं उशिराने झाली. प्रथम फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्येच चेन्नईने ४ मोठे विकेट्स गमावले होते. यानंतर मात्र चेन्नईचा संघ सावरू शकला नाही. तर रवींद्र जडेजा एका षटकात दोन मोठे विकेट्स घेत चेन्नईला दोन धक्के दिले.

चेन्नईचा भाग असलेला रवींद्र जडेजा आता राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसेल. जडेजाला आठवं षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात आली. त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर सर्फराझ खानला पायचीत करत बाद केलं. यानंतर आलेल्या शिवम दुबेने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवरही शिवम दुबे मोठा फटका खेळायला गेला आणि झेलबाद झाला.

शिवम दुबेला बाद केल्यानंतर जड्डूचं ‘गन-शॉट’ सेलिब्रेशन

शिवम दुबेला झेलबाद केल्यानंतर जडेजाने हातानेच गोळी घालण्याची अॅक्शन केली आणि बुम असं म्हणाला आणि नंतर हसू लागला. जडेजाने केस कापत नवीन लूकसह आयपीएल खेळण्यासाठी उतरला आहे. जडेजाने गोलंदाजीला येताच आपल्या फिरकीच्या जाळ्यात चेन्नईचा डाव सावरणाऱ्या दोघांना माघारी धाडलं. जडेजाच्या या नव्या सेलिब्रेशनचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.