Ravindra Jadeja Joins BJP: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करून राजकारणात पाऊल ठेवले आहे. स्टार क्रिकेटरची पत्नी रिवाबा जडेजा आधीपासून गुजरातमधील जामनगरमधून भाजपच्या आमदार आहेत. अलीकडेच रिवाबाने सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आणि रवींद्र जडेजा अधिकृतपणे भाजपचा सदस्य झाला असल्याचे सांगितले. यासह त्याचे सदस्यतापत्रही तिने जोडले आहे. रिवाबाने नुकतीच जडेजाबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. तिने एका पोस्टद्वारे सांगितले की, रवींद्र जडेजाने भाजपचे सदस्यत्व घेतले आहे. जडेजाने अलीकडेच २०२४ च्या टी२० विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. हेही वाचा - गंभीर आजाराशी लढा देतोय ‘हा’ भारतीय वंशाचा क्रिकेटपटू, दिल्लीतील रूग्णालयात ICUमध्ये केलं दाखल रवींद्र जडेजाने भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे, यात आश्चर्याची बाब नक्कीच नाही कारण जडेजा पत्नीबरोबर अनेकदा निवडणुकांच्या वेळेस पत्नीबरोबर होता. रिवाबाबरोबर अनेकदा प्रचार करतानाही जडेजा दिसला आहे. निवडणुकीदरम्यान तो पत्नी रिवाबासह भाजपचा प्रचार करताना दिसला आहे. दोघांनी अनेक रोड शोही केले. जडेजाची पत्नी रिवाबा जामनगर उत्तर मतदारसंघातून आमदार आहे. तर आता रवींद्र जडेजाने भाजपचे सदस्यत्व घेतले आहे. रिवाबा तिच्या मतदारसंघात करत असलेली कामांची सोशल मीडियाजद्वारे माहिती देते. नुकतंच गुजरातमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पूरात ती मतदारसंघातील काम स्वत: उपस्थित राहून पाहत होती आणि यादरम्यान पूरातून लोकांची सुटका करत असताना ती स्वत: कंबरेभर पाण्यात उभी होती, याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. हेही वाचा - ६६ कोटी! कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने २०२३-२४ साठी भरला सर्वाधिक कर? रवींद्र जडेजाची क्रिकेट कारकीर्द रवींद्र जडेजाने T20 विश्वचषक २०२४ नंतर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने भारतासाठी ७४ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ५१५ धावा केल्या आहेत आणि ५४ विकेट घेतले आहेत. १५ धावांत तीन विकेट घेणे ही त्याची सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे. टी-२० मधून निवृत्ती घेतल्यानंतरही तो भारतासाठी एकदिवसीय आणि कसोटी खेळत राहणार आहे. हेही वाचा - Paris Paralympics 2024: २ सुवर्ण आणि २ रौप्य, भारताच्या पॅरा खेळाडूंनी पॅरिसमध्ये घडवला इतिहास, तिरंदाजीत पदकाला गवसणी