Ravindra Jadeja Viral Video: जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरु आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २२५ धावांचा डोंगर उभारला. यादरम्यान रियान परागने ९० धावांची दमदार खेळी केली. तर रवींद्र जडेजाने २० धावांची खेळी करुन हातभार लावला. दरम्यान रवींद्र जडेजा फलंदाजीला येताच असं काही घडलं, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
राजस्थान रॉयल्स संघाला या सामन्यात हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशीची जोडी स्वस्तात माघारी परतली. त्यानंतर कर्णधार रियान पराग आणि ध्रुव जुरेलने मिळून संघाचा डाव सांभाळला. ध्रुव जुरेल बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला.
जडेजाचा व्हिडीओ होतोय व्हायरल
राजस्थान रॉयल्सला ११४ धावांवर तिसरा धक्का बसला ध्रुव जुरेल ४२ धावांवर माघारी परतला. त्यानंतर रवींद्र जडेजा मैदानावर आला. जडेजा मैदानात येताच कुलदीप यादव त्याच्या समोर आला. त्यावेळी त्याने आपली बॅट तलवारसारखी फिरवली. अर्धशतक किंवा शतक झळकावल्यानंतर तो तलवारसारखी बॅट फिरवतो, पण यावेळी त्याने मैदानात येताच कुलदीप यादवच्या तोंडासमोर तलवारसारखी बॅट फिरवली. कुलदीप यादवने देखील त्याला धक्का दिला. हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
राजस्थान रॉयल्सने उभारला २२५ धावांचा डोंगर
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्यण घेतला. हा निर्णय सुरूवातीला चुकीचा ठरला. कारण वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर रियान पराग आणि ध्रुव जुरेलने मिळून संघाचा डाव सावरला. दोघांनी मिळून महत्वपूर्व भागीदारी केली. जुरेलने ४२ धावांची खेळी केली. तर रियान परागने ९० धावांची खेळी केली. रियान परागकडे शतक झळकावण्याची संधी होती. पण त्याचं शतक अवघ्या १० धावांनी हुकलं. रवींद्र जडेजाने २० धावा केल्या. शेवटी डोनोवन फरेराने १४ चेंडूत नाबाद ४७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने २२५ धावांचा डोंगर उभारला.
