Ravindra Jadeja Ranji Trophy century Saurashtra vs Chhattisgarh: रणजी करंडक स्पर्धेच्या नवीन हंगामाची सुरुवात रवींद्र जडेजाने शतकी खेळीने केली आहे. रवींद्र जडेजा सौराष्ट्रकडून खेळणा हे कळताच त्याच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या, कारण त्याच्याकडून दमदार कामगिरीची मोठी अपेक्षा होती. भारताच्या या अत्यंत अनुभवी अष्टपैलू खेळाडूने शतक झळकावत दणक्यात सुरूवात केली.

सौराष्ट्र आणि छत्तीसगड यांच्यातील सामन्यात जडेजाने शानदार शतक ठोकलं आणि या कामगिरीतून त्याने आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी आपण सज्ज असल्याचंही सिद्ध केलं. सौराष्ट्र आणि छत्तीसगड यांच्यात रणजी करंडक ‘एलिट गट ब’ मधील सामना खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना सौराष्ट्र संघाने पहिल्या डावात ३९२ धावांत सर्व गडी गमावले.

रवींद्र जडेजाने संघासाठी २०९ चेंडूंत १०२ धावा केल्या; प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे त्याचं १६ वं शतक ठरलं. या खेळीदरम्यान त्याने सात चौकार लगावले. जडेजा बाद होताच संघाचा डाव संपुष्टात आला. रवींद्र जडेजाला शतकी खेळीनंतर धर्मेंद्रसिंह जडेजाने बाद केलं. रवींद्रव्यतिरिक्त प्रेरक मंकड यानेही संघासाठी शतकी खेळी केली; त्याने १५० चेंडूंत १२९ धावा केल्या, ज्यामध्ये १५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

रवींद्र जडेजाने केवळ शतकच झळकावलं नाही, तर आपल्या खेळीदरम्यान महत्त्वपूर्ण भागीदारीही रचल्या. त्याने प्रेरक मंकडसह पाचव्या विकेटसाठी २९७ चेंडूंमध्ये २०५ धावांची भागीदारी केली, जी सौराष्ट्रसाठी या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली. या भागीदारीदरम्यान प्रेरक मंकडने शतक केलं आणि १५० चेंडूंमध्ये १२९ धावा केल्या. रवींद्र जडेजा आणि प्रेरक मंकड यांनी केलेल्या शतकी खेळी आणि त्यांच्यातील द्विशतकी भागीदारीमुळेच सौराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करताना ३९२ धावा केल्या.

छत्तीसगढच्या गोलंदाजांमध्ये देव आदित्य सिंगने उत्कृष्ट गोलंदाजी केली; त्याने २४ षटकांत ६७ धावा देत पाच बळी घेतले. रुद्र प्रताप आणि धर्मेंद्रसिंह जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर संदीप वॉरियरने एक बळी मिळवला. आता छत्तीसगडचा संघ आपल्या पहिल्या डावात किती धावा करतो आणि जडेजा किती विकेट्स घेणार यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.