चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) आपल्या इंस्टाग्राम अकांऊटवरून चेन्नई सुपर किंग्ज संबंधित सगळ्या पोस्ट हटवल्या आहेत. यामुळे जडेजा चेन्नईचा संघ सोडणार का? अशा प्रकारच्या चर्चा सुरु आहेत. आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरु होण्यापूर्वी दोन दिवस अगोदर सीएसके संघाच कर्णधारपद रवींद्र जाडेजाकडे सोपवण्यात आलं होतं, मात्र, दुखापतीमुळे जडेजा आयपीएलच्या मध्यातूनच बाहेर पडला आणि कर्णधार पदाची जबाबदारी पुन्हा महेंद्रसिंग धोनीकडे सोपवण्यात आली होती.

हेही वाचा- Video : लंडनच्या रस्त्यावर मनसोक्त नाचला ‘दादा’; मुलगी झाली डीजे

आयपीएलमध्ये चेन्नईची निराशाजनक कामगिरी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चैन्नई सुपर किंग्सने निराशाजनक कामगिरी केली होती. चैन्नईचा आठ पैकी सहा सामन्यांमध्ये पराभव झाला होता. कर्णधार पदाची जबाबदारी घेतलेल्या जडेजाला या हंगामात चमकदार कामिगिरी करता आली नाही. १० सामन्यांमध्ये त्याने केवळ ११६ धावा काढल्या होत्या.

धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही

चैन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा नुकताच वाढदिवस झाला. जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. परंतु रवींद्र जडेजाने महेंद्रसिंग धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यामुळे धोनी आणि जेडेजामध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

दुखापतीनंतर रवींद्र जडेजा आयपीएलबाहेर
दुखापतीमुळे आयपीएलच्या मध्यातूनच जडेजा बाहेर पडला होता. मात्र, हैदराबाद विरुद्धच्या सामन्याअगोदर जडेजाकडून कर्णधारपद काढून घेण्यात आलं होतं. त्यामुळेच नाराज झालेल्या जडेजाने आयपीएलमधून माघार घेतली असल्याची चर्चा सुरु होती. परंतु फलंदाजी आणि गोलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी जडेजाने स्वत: कर्णधार पद सोडले असल्याचे चैन्नई सुपर किंग्ज संघाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.