scorecardresearch

Premium

Asia Cup 2023: बुमराह-शमी नव्हे तर ‘हा’ खेळाडू मोठा विक्रम करण्यास सज्ज, बनू शकतो आशिया कपचा नंबर वन गोलंदाज

Asia Cup ODI format: आशिया कपच्या वनडे फॉरमॅटमध्ये श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आतापर्यंत ३० विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. पण आता आगामी स्पर्धेत एक भारतीय गोलंदाज हा विक्रम मोडू शकतो.

most wickets in Asia Cup ODI format
टीम इंडिया (फोटो-संग्रहित छायाचित्र लोकसत्ता)

Ravindra Jadeja all set to break Muttiah Muralitharan’s record: ३० ऑगस्टपासून एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेचा १४वा हंगामा सुरू होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडिया २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध मोहिमेला सुरुवात करेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीबद्दल सर्वजण बोलत आहेत. पण आता आम्ही अशाच एका आकडेवारीबद्दल सांगणार आहोत, जे जाणून अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांना आश्चर्य वाटेल. ही आकडेवारी एकदिवसीय आशिया चषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांची आहे.

यावेळी असे बहुतेक गोलंदाज टीम इंडियाच्या लाइनअपमध्ये प्रवेश करतील, ज्यांनी जास्त आशिया कप खेळला नाही. शमी आणि बुमराह हे अनुभवी आहेत. पण दोघांनी या स्पर्धेत केवळ ४-४ सामने खेळले आहेत. परंतु एक नाव असे आहे, जे केवळ अनुभवीच नाही तर आगामी स्पर्धेत इतिहासही रचू शकते. तो म्हणजे भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा.

Video of umpire in Sindh Premier League goes viral
SPL 2024 : अंपायरने अपील न होताच फलंदाजाला केले बाद घोषित, पाकिस्तानमधील सामन्यातील VIDEO होतोय व्हायरल
India vs England first test match from today in Hyderabad sport news
भारताची फिरकी ‘बॅझबॉल’ला रोखणार? इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना आजपासून हैदराबादमध्ये; अश्विन, जडेजावर नजरा
Pakistan hockey Team Coach Shahnaz Sheikh
Shahnaz Shaikh : पाकिस्तानच्या हॉकी कोचने ऑलिम्पिक पात्रता फेरीतील पराभवासाठी खराब अंपायरिंगला धरले जबाबदार
australian open 2024 carlos alcaraz medvedev enter quarter finals
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : अल्कराझ, मेदवेदेवचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, झ्वेरव्ह, हुरकाझ, झेंग, यास्त्रेमस्काचीही आगेकूच

मुरलीधरनचा मोठा विक्रम मोडण्यासाठी रवींद्र जडेजा सज्ज –

एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत २४ सामन्यांत ३० बळी घेणारा श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू मुथय्या मुरलीधरन अव्वल स्थानावर आहे. पण विशेष म्हणजे सर्व टॉप १० खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे. त्याचबरोबर भारताचा रवींद्र जडेजा आणि बांगलादेशचा शाकिब अल हसन अनुक्रमे ९व्या आणि १०व्या क्रमांकावर आहेत. दोघांच्या नावावर १९-१९ विकेट आहेत. म्हणजेच आगामी स्पर्धेत दोघांना आशिया चषकातील नंबर १ गोलंदाज बनण्याची संधी आहे. आशिया कप २०२३ मध्ये प्रत्येक संघ जास्तीत जास्त ६ सामने खेळू शकतो. दुसरीकडे, जर संघ सुपर ४ पर्यंत गेले आणि अंतिम फेरीत गेले नाहीत, तर ते किमान ५ सामने खेळतील.

हेही वाचा – World Cup 2023: वीरेंद्र सेहवागची विश्वचषकाबद्दल मोठी भविष्यवाणी; म्हणाला, ‘हा’ भारतीय फलंदाज करणार सर्वाधिक धावा

एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत रवींद्र जडेजाचा विक्रम –

एकदिवसीय आशिया कपच्या इतिहासात रवींद्र जडेजाने आतापर्यंत १४ सामन्यांच्या १४ डावांत १९ विकेट्स घेतल्या आहेत. जर भारतीयांबद्दल बोलायचे, तर त्याच्या आसपास कोणीही नाही. रविचंद्रन अश्विनच्या नावावर १४ विकेट्स आहेत. मात्र, तो सध्याच्या संघाचा भाग नाही. याशिवाय कुलदीप यादवने १०, जसप्रीत बुमराहने ९ आणि मोहम्मद शमीने ८ बळी घेतले आहेत.

एकदिवसीय आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे सक्रिय गोलंदाज –

रवींद्र जडेजा – १९ विकेट्स
शकीब अल हसन – १९ विकेट्स
रविचंद्रन अश्विन – १४ बळी (संघाबाहेर)
राशिद खान – १० विकेट्स
कुलदीप यादव – १० विकेट्स

हेही वाचा – World Cup 2023: “त्याची आकडेवारी खूपच वाईट…”, आकाश चोप्राने सांगितला विश्वचषकचा कमकुवत दुवा

भारताकडून एकदिवसीय आशिया कपमध्ये इरफान पठाणने सर्वाधिक २२ विकेट घेतल्या आहेत. पण तोही निवृत्त झाला आहे, त्यामुळे जडेजा या स्पर्धेत भारताचा नंबर १ गोलंदाज होण्याच्या जवळ आहे. दुसरीकडे, त्याने आगामी स्पर्धेत १२ विकेट घेतल्यास, तो एकदिवसीय आशिया चषकातील नंबर १ गोलंदाज देखील बनेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ravindra jadeja set to break muttiah muralitharans record for most wickets in odi format of asia cup vbm

First published on: 26-08-2023 at 14:47 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×