scorecardresearch

Premium

WTC Final 2023 : रवींद्र जडेजाने रचला इतिहास, ‘या’ दिग्गज खेळाडूचा विक्रम मोडून इंग्लंडमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी

India vs Australia, WTC 2023 Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने कमाल केली आहे.

Rabindra Jadeja Breaks Bishan Singh Bedis Record
रविंद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला. (Image-Twitter)

WTC 2023 Final India vs Australia : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने कमाल केली आहे. ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग सुरु असताना जडेजाने आतापर्यंत २ विकेट घेतल्या आहेत. या २ विकेट्सच्या जोरावर जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. जडेजा आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जास्त विकेट घेणारा डावखुरा गोलंदाज बनला आहे. त्याने अशी कामगिरी करून बिशन सिंग बेदी यांचा विक्रम मोडला आहे.

बेदी यांनी डावखुरा फिरकीपटू गोलंदाज म्हणून भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये २६६ विकेट घेतल्या होत्या. आता जडेजाच्या नावावर २६७ विकेट्सची नोंद झाली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये डावखुरा फिरकीपटू म्हणून सर्वात जास्त विकेट घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या रंगना हेराथच्या नावावर आहे. हेराथने कसोटी क्रिकेटमध्ये ४३३ विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली आहे. तर, न्यूझीलंडचा डॅनियल विटोरीने कसोटीत ३६२ विकेट्स घेतल्या आहेत.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

नक्की वाचा – WTC Final : फ्लॉप झाल्यानंतर विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर शेअर केली महत्वाची पोस्ट, ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं, म्हणाला…

याशिवाय इंग्लिश गोलंदाज डेरेक अंडरवुडने कसोटीत २९७ विकेट्स घेण्याची कमाल केलीय. त्यानंतर जडेजाने या क्रमवारीत बाजी मारली आहे. जडेजाने आतापर्यंत ६५ कसोटी सामन्यात २६७ विकेट घेतल्या आहेत. पहिल्या इनिंगमध्ये ४६९ धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारताच्या पहिल्या इनिंगला २६९ धावांवर गारद केलं. त्यानंतर १७३ धावांचा लीड घेत दिवस संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने आणखी २९६ धावा फलकावर लावल्या.

भारताला या सामन्यात टीकून राहण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे उर्वरित ६ विकेट लवकर घ्यावे लागतील आणि फलंदाजीने चांगली कामगिरी करावी लागेल.दिवसाचा खेळ संपेपर्यंत मार्नस लाबुशेन ४१ आणि कॅमरून ग्रीन ७ धावांवर नाबाद आहे. भारताकडून जडेजाने २ विकेट घेतल्या आहेत. तर सिराज आणि उमेश यादवला प्रत्येकी एक विकेट मिळाली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ravindra jadeja takes most wickets in test cricket as left arm spinner he breaks bishn singh bedis record wtc final 2023 nss

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×