Ravindra Jadeja Brilliant Catch Video Viral : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा चौथा सामना आजपासून नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु झाला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत जबरदस्त सुरुवात केली. कांगारु संघाचा फलंदाज उस्मान ख्वाजाने दमदार शतक ठोकलं. २५१ चेंडूत १५ चौकार मारत ख्वाजाने १०४ धावांची खेळी केली. तर कॅमरॉन ग्रीनने ६४ चेंडूत ४९ धावा केल्या आहेत. आजच्या इनिंगमध्ये ९० षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने ४ गडी गमावत २५५ धावा केल्या आहेत. पण या सामन्यात क्रिकेटप्रेमींच्या आकर्षणाची विकेट ठरली ट्रेविस हेडची..

आश्विनच्या जाळ्यात अडकला ट्रेविस हेड

अहमदाबाद कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी उस्मान ख्वाजा आणि ट्रेविस हेडने सलामी दिली. दोन्ही फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. पण १६ वं षटक टाकण्यासाठी आलेल्या आश्विनने तिसऱ्या चेंडूवरच हेडची शिकार केली. आश्विनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात हेडने हवेतच चेंडू उडवला. पण मैदानात टपून बसलेल्या रविंद्र जडेजाने संधी मिळताच अप्रतिम झेल घेतला. हेडला बाद केल्यानंतर भारताला पहिली विकेट मिळाली.

IPL 2024 PBKS Vs RR Match Updates in Marathi
PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल
Jasprit Bumrah taking five wickets against RCB in IPL 2024
MI vs RCB : जसप्रीत बुमराह फलंदाजांसाठी इतका धोकादायक का आहे? आपल्या यशाचे गुपित स्वत:च केले उघड
Andre Russell Closed His Ears as fans cheer when ms dhoni came to bat
IPL 2024: धोनीची एंट्री होताच जल्लोष टिपेला; आंद्रे रसेलने ठेवले कानावर हात- व्हीडिओ व्हायरल
IPL 2024 Chennai Super Kings vs Gujarat Titans Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs GT: ‘पहिल्या चेंडूवर सिक्स मारतो’ समीर रिझवीने भावाला दिलं होतं वचन, व्हीडिओ व्हायरल

नक्की वाचा – जडेजाच्या फिरकीपुढं स्मिथची दांडी गुल, बाद झाल्यावर खेळपट्टीवर आपटली बॅट, स्मिथला राग का आला? पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

सुरुवात चांगली केली पण ट्रेविस हेडला आश्विनने रोखलं आणि…

चौथ्या कसोटी सामन्यात ट्रेविस हेड चांगल्या लयमध्ये खेळताना दिसत होता. पण संघाला एक चांगली सुरुवात दिल्यानंतर हेड मोठी खेळी करु शकला नाही. त्याने सलामीला आल्यानंतर ४४ चेंडूंचा सामना केला. यामध्ये त्याने ७२.७२ च्या स्ट्राईक रेटने ३२ धावा केल्या. हेडने या इनिंगमध्ये सात चौकार ठोकले. हेडने दमदार सुरुवात केल्यानंतर आश्विनने १६ व्या षटकात लॉलीपॉप चेंडू टाकून हेडला फसवलं. आश्विनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या हेडने उंच चेंडू उडवला, पण रविंद्र जडेजाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून झेल घेत हेडला तंबुत पाठवलं.