भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या पत्नीने एक धक्कादायक विधान केलं आहे. या विधानानंतर ती सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे आणि तिच्या वक्तव्याचा व्हीडिओदेखील व्हायरल होत ाहे. रिवाबा जडेजाने भारतीय खेळाडूंवर गंभीर आरोप केले आहेत. रिवाबाने या वक्तव्यादरम्यान स्वत:च्या नवऱ्याला तर क्लीन चिट दिली. पण इतर खेळाडूंबाबत मात्र सर्वांच्या मनात संभ्रम निर्माण केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रिवाबा जडेजा गुजराती भाषेत भाषण देताना दिसत आहे. भाषणादरम्यान तिने उघडपणे सांगितलं की तिचा नवरा रवींद्र जडेजा वारंवार विदेशात प्रवास करतो पण कधीही नशा करत नाही. पण इतर भारतीय खेळाडू व्यसनाधीन आहेत.

रवींद्र जडेजाची रिवाबा जडेजा हिने भाषणादरम्यान म्हटलं, “माझे पती (रवींद्र जडेजा) क्रिकेट सामने खेळण्यासाठी लंडन, दुबई आणि ऑस्ट्रेलिया सारख्या अनेक देशांमध्ये प्रवास करतात, पण त्यांनी कधीही नशा केलीली नाही. त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारची नशा केलेली नाही.”

रिवाबाने पुढे जे सांगितले ते खूपच वादग्रस्त ठरलं आहे. ती म्हणाली, “इतर खेळाडू व्यसनाधानी आहेत आणि मी त्यांच्यावर कोणतेही बंधन घातलेलं नाही, मी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे, परंतु त्यांनी (जडेजा) कधीही नशा केलेली नाही, त्यांची जबाबदारी जबाबदारी समजून त्याप्रमाणे ते वागतात.”

गुजराती भाषेत दिलेल्या भाषणात, रिवाबा जडेजाने स्पष्ट केलं की रवींद्र जडेजा कोणतीही नशा करत नाही तिने पुढे सांगितलं की इतर क्रिकेटपटू नशा करतात. पण रिवाबाच्या वक्तव्याने मात्र सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.

रिवाबा जडेजा या जामनगरच्या भाजप आमदार आहेत. या वर्षी त्यांना गुजरात मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आलं. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत तिने दणदणीत विजय मिळवला. रिवाबा अनेक वेळा सामन्यांदरम्यान रवींद्र जडेजाला पाठिंबा देताना दिसल्या आहेत.