विराट कोहलीच्या उत्कृष्ट शतकी खेळीच्या बळावर आरसीबीने केकेआर विरूद्धचा सामना विकेट्सने जिंकला. या विजयासह आरसीबीच्या संघाचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित केलं आहे.
चेस मास्टर विराट कोहलीने केकेआरविरूद्ध सामन्यात ५८ चेंडूत १० चौकार व ३ षटकारांसह शतक झळकावलं. विराटचं हे आयपीएल कारकिर्दीतील नववं शतक ठरलं. विराटच्या या शतकी खेळीमुळे केकेआरविरूद्धचा सामना एकतर्फी केला.
केकेआरने दिलेल्या १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरूवात चांगली झाली. पण जेकब बेथल १५ धावा करत बाद झाला. त्यानंतर दोन वेळा डकवर बाद झालेल्या विराटने मात्र अर्धशतकी खेळी करत आपल्या फॉर्मची झलक दाखवून दिली. विराट कोहली व देवदत्त पडिक्कल यांनी ५९ चेंडूत ९२ धावांची खेळी केली. देवदत्त पडिक्कल २७ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. तर कर्णधार रजत पाटीदार ११ धावा करत बाद झाला. टीम डेव्हिड फक्त २ धावा करत माघारी परतला, आपला १९वा सीझन खेळणाऱ्या मनिष पांडेने मैदानावर डाईव्ह मारत अनपेक्षित झेल टिपला. त्याचा हा झेल पाहून सगळेच अवाक् झाले.
आरसीबीने नाणेफेक जिंकत केकेआरला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. केकेआरचे दोन्ही सलामीवीर १९ आणि १८ धावा करत बाद झाले. त्यानंतर अंगक्रिश रघुवंशीने संघाचा डाव सावरला. रघुवंशीने ४६ चेंडूत ७ चौकार व ३ षटकारांसह ७१ धावांची खेळी केली. तर कॅमेरून ग्रीनने २४ चेंडूत ३२ धावा केल्या. तर रिंकू सिंहने २९ चेंडूत ३ चौकार व २ षटकारांची ४९ धावांची खेळी केली. यासह केकेआरने २० षटकांत ४ बाद १९२ धावा केल्या आहेत. आरसीबीकडून या सामन्यात भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड व रसिख सलाम दार यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.
