IPL 2026 RCB vs CSK Today’s Match: आयपीएल २०२६ मधील ११ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी बंगळुरमधील हवामानामुळे चिंता वाढली आहे. हा सामना बंगळूरमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. हवामान अंदाजानुसार, पावसामुळे सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. हवामान विभागाने बंगळूरसाठी यलो अलर्टही जारी केला आहे. याचा अर्थ, हा हाय-व्होल्टेज आयपीएल सामना होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरसीबीने या हंगामात आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे आणि संघाने सलामीच्या सामन्यात विजय मिळवत मोहिमेला सुरूवात केली. गतविजेत्या आरसीबी संघाने सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवून हंगामाची सुरुवात केली. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सने आपले पहिले दोन सामने सलग गमावले आहेत. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर सीएसकेच्या अडचणी वाढू शकतात. सलग दोन सामने गमावल्याने सीएसकेचा संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानी आहे.
कसं आहे बंगळुरमधील हवामान?
अॅक्युवेदरनुसार, बंगळूरमध्ये सायंकाळी ६ नंतर ७ ते ८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण, हवामान विभागाच्या इशाऱ्यांनुसार हा अंदाज वाढू शकतो. आंतरराष्ट्रीय हवामान विभागाने (आयएमडी) रविवारी दुपारी बंगळूरसाठी जोरदार वादळ आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत यलो अलर्ट जारी केला आहे. बंगळूरच्या आसपासच्या शहरांमध्येही मुसळधार पाऊस आणि वादळांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तात सामन्याच्या पूर्वावलोकनात पावसाच्या शक्यतेचा उल्लेख केला होता. त्यात म्हटलं होतं की, सामन्यादरम्यान हलका पाऊस पडू शकतो. बंगळूरमधील हवामान सहसा अचानक बदलते. त्यामुळे, जर पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ
फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग, जेकब डफी, सुयश शर्मा, जेकब बेथेल, रसिक सलाम दार, कनिष्क चौहान, वेंकटेश अय्यर, जोश हेझलवूड, मंगेश यादव, विहान मल्होत्रा विक्की ओसवाल, जॉर्डन कॉक्स, स्वप्निल सिंह, सात्विक देसवाल.
चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ
संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, सर्फराझ खान, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, नूर अहमद, अंशुल कंबोज, मॅट हेन्री, खलील अहमद, जेमी ओव्हरटन, राहुल चहर, मॅथ्यू शॉर्ट, रामकृष्ण घोष, गुर्जपनीत सिंग, अकील हुसैन, एम एस धोनी, श्रेयस गोपाल, स्पेन्सर जॉन्सन, मुकेश चौधरी, उर्विल पटेल, अमन खान, डेवाल्ड ब्रेविस, झॅकरी फॉल्क्स
