Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals WPL 2026 Final Highlights: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दिल्ली कॅपिटल्सला नमवत दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. दिल्लीने आरसीबीला विजयासाठी 204 धावांचं लक्ष्य दिलं होतं. आरसीबीने हे लक्ष्य १९.४ षटकांत गाठत विक्रमी विजय नोंदवला. आरसीबीकडून स्मृती मानधना-जॉर्जिया वॉल यांनी उत्कृष्ट खेळी साकारल्या. तर दिल्लीकडून जेमिमा रॉड्रीग्ज, लिझेल ली, लॉरा वोल्व्हार्ड व चिनेल हेन्री यांनी संघाला विक्रमी धावसंख्येपर्यंत नेलं, पण सलग चौथ्यांदा दिल्लीला अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागणार आहे.
RCB vs DC WPL 2026 Final Highlights: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स वुमन्स प्रीमियर लीग फायनलचे हायलाईट्स
WPL Final Live: आरसीबी दुसऱ्यांदा ठरली WPL चॅम्पियन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दुसऱ्यांदा वुमन्स प्रीमियर लीग ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. स्मृती मानधनाच्या नेतृत्त्वाखाली फायनलमध्ये आरसीबीने ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं.
RCB vs DC Live: चिनेल हेन्रीच्या खात्यात मोठी विकेट
१९व्या षटकात चिनेल हेन्रीने स्मृती मानधनाला क्लीन बोल्ड करत संघाला सर्वात मोठी विकेट मिळवून दिली. स्मृती मानधना ४१ चेंडूत १२ चौकार व ३ षटकारांसह ८७ धावा करत बाद झाली. यासह आता अखेरच्या षटकात आरसीबीला विजयासाठी ६ चेंडूत १० धावांची गरज आहे.
WPL Final Live: रिचा घोष झेलबाद
नंदनी शर्माने १८व्या षटकात रिचा घोषला झेलबाद करत संघाला तिसरी विकेट मिळवून दिली. यासह आरसीबी-दिल्ली अंतिम सामना अधिक रोमांचक झाला आहे. रिचा ६ धावा करत बाद झाली. आरसीबीला विजयासाठी १४ चेंडूत २३ धावांची गरज आहे.
RCB vs DC Live: जॉर्जिया वॉल झेलबाद
मिन्नू मणीने १७व्या षटकात जॉर्जिया वॉलला झेलबाद करत संघाला दुसरी विकेट मिळवून दिली आहे. जॉर्जिया वॉल ५४ चेंडूत १४ चौकारांसह ७९ धावा करत झेलबाद झाली. आता आरसीबीला विजयासाठी २१ चेंडूत ३० धावांची गरज आहे.
RCB vs DC Live: आरसीबी विजयाच्या दिशेने
जॉर्जिया वॉल व स्मृती मानधना यांच्या १६० धावांच्या भागीदारीच्या बळावर आरसीबी विजयाच्या दिशेने पोहोचली आहे. आता आरसीबीला विजयासाठी २४ चेंडूत ३५ धावांची गरज आहे.
स्मृती मानधनाने वुमन्स प्रीमियर लीग फायनल इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावलं आहे. स्मृतीने अवघ्या २३ चेंडूत ५० धावांचा आकडा गाठला. यासह आरसीबी विजयाच्या अधिक जवळ पोहोचली आहे.
RCB vs DC Live: १० षटकांत किती धावा केल्या?
ग्रेस हॅरिसच्या विकेटनंतर स्मृती मानधना व जॉर्जिया वॉल यांनी संघाचा डाव सावरला आहे. यासह आरसीबीने १० षटकांत १ विकेट गमावत १०० धावा केल्या आहेत. जॉर्जिया वॉल ४७ धावा तर स्मृती मानधना ३९ धावा करत खेळत आहे. आता आरसीबीला विजयासाठी ६० चेंडूत १०४ धावांची गरज आहे.
RCB vs DC Live: पॉवरप्ले
पहिली विकेट गमावल्यानंतर जॉर्जिया वॉल व स्मृती मानधना यांनी संघाला डाव सावरला. यासह पॉवरप्लेमध्ये आरसीबीने १ बाद ५९ धावा केल्या आहेत.
WPL Final Live: आरसीबीला पहिला धक्का
आरसीबीने पहिल्या षटकात दोन चौकार लगावत ९ धावा कुटल्या. पण दुसरं षटक टाकण्यासाठी आलेल्या चिनेल हेन्रीने ग्रेस हॅरिसला पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला.
दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना वुमन्स प्रीमियर लीग इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. लिझेल ली आणि शफालीची दणक्यात सुरूवात, जेमिमा रॉड्रीग्जचं अर्धशतक, लॉरा-हेन्रीची अर्धशतकी खेळीमुळे दिल्लीने २०३ धावांचा डोंगर उभारला. यासह आरसीबीला विजयासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने २०४ धावांचं मोठं आव्हान दिलं आहे.
दिल्लीकडून ३० चेंडूत ३७ धावा केल्या. तर शफाली २० धावा करत बाद झाली. यानंतर कर्णधार जेमिमा रॉड्रीग्जने ३७ चेंडूत ८ चौकारांसह ५७ धावा केल्या. तर लॉरा वुल्वार्ड यांनी २५ चेंडूत ३ चौकार व २ षटकारांसह ४४ धावांची खेळी केली. तर चिनेल हेन्रीने १५ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांसह ३५ धावा केल्या. दिल्लीच्या टॉप-५ फलंदाजांची बॅट तळपल्याने संघ मोठी धावसंख्या उभारू शकला.
WPL Final Live: चिनेल हेन्रीचं वादळ
चिनेल हेन्रीने १९व्या षटकात नादिन दे क्लार्कची धुलाई करत २४ धावा कुटल्या. ज्यामध्ये तिने ४ चौकार व एक षटकार लगावला. यासह १९ षटकांत दिल्लीने ३ बाद १८८ धावा केल्या आहेत.
RCB vs DC Live: जेमिमा रॉड्रीग्जचं अर्धशतक
जेमिमा रॉड्रीग्जने अंतिम सामन्यात शानदार अर्धशतक केलं आहे. जेमिमाने ३२ चेंडूत ७ चौकारांसह अर्धशतकी खेळी केली. यासह दिल्लीने १५ षटकांत २ बाद १४० धावा केल्या आहेत. अर्धशतकी खेळी केल्यानंतर सायली सातघरेने १६व्या षटकात झेलबाद केलं.
WPL Final Live: दिल्लीला दुसरा मोठा धक्का
लिझेल लीने सावध सुरूवातीनंतर वादळी फटकेबाजी करत संघाला वेगाने धावा करून दिल्या. नादिन दी क्लार्कच्या सातव्या षटकातील पहिल्या चेंडूवर बाद होता होता वाचली, पण तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाली. यासह दिल्लीला दुसरा धक्का बसला. यासह दिल्लीने ८ षटकांत २ बाद ७४ धावा केल्या आहेत.
RCB vs DC Live: दिल्लीला पहिला धक्का
दिल्ली कॅपिटल्सला पहिला मोठा धक्का बसला असून पॉवरप्लेच्या अखेरच्या षटकात आरसीबीला विकेट मिळाली. अरूंधतीने पाचवा चेंडू बाऊन्सर टाकला आणि हा चेंडू खेळायला जाताच शफालीच्या बॅटची कड घेत चेंडू मागे गेला आणि रिचाने उत्कृष्ट झेल टिपला. यासह पॉवरप्लेमध्ये दिल्लीने १ विकेट गमावत ५३ धावा केल्या आहेत.
WPL Final: एका षटकात २० धावा
सायली सातघरे चौथं षटक टाकण्यासाठी आली आणि षटकातील पहिल्या दोन चेंडूवर षटकार खेचले आणि त्यानंतर वाईड चेंडूवर ५ धावा मिळाल्या. यासह चौथ्या षटकात २० धावा दिल्याने दिल्लीने नाबाद २९ धावा केल्या.
RCB vs DC WPL Final : आरसीबीची शानदार सुरूवात
आरसीबीने शानदार सुरूवात करत भेदक गोलंदाजी केली आहे. लॉरेन बेलने पहिल्या षटकात ५ धावा, सायलीने दुसऱ्या षटकात ३ धावा तर लॉरेन बेलने तिसऱ्या षटकात फक्त एक धाव दिली. यासह दिल्लीने फक्त ९ धावा केल्या आहेत. ज्यात लॉरेन बेलने १२ पैकी ९ डॉट बॉल टाकले आहेत.
RCB vs DC WPL Final : फायनलला सुरूवात
आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील अंतिम सामन्याला सुरूवात झाली आहे. दिल्लीकडून शफाली वर्मा व लिझेल ली ही जोडी सलामीला उतरली आहे. तर आरसीबीकडून लॉरेन बेल गोलंदाजीने सुरूवात केली आहे.
RCB vs DC WPL Final: राष्ट्रगीतासाठी दोन्ही संघ मैदानावर
वुमन्स प्रीमियर लीग २०२६ च्या अंतिम सामन्यापूर्वी दोन्ही संघ आरसीबी व दिल्लीचे खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानावर उतरले आहेत.
RCB vs DC WPL Final: क्लोजिंग सेरेमनीला सुरूवात
वुमन्स प्रीमियर लीग २०२६ च्या अंतिम सामन्यापूर्वी क्लोजिंग सेरेमनीला सुरूवात झाली आहे. मलायका अरोरा हिने सुरूवातीला डान्स परफॉर्मन्स सादर केला आणि त्यानंतर गायक तलविंदर परफॉर्म करत आहे.
आरसीबीची प्लेईंग इलेव्हन
ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (कर्णधार), जॉर्जिया वॉल, ऋचा घोष (यष्टीरक्षक), राधा यादव, नादिन डी क्लार्क, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, सायली सातघरे, श्रेयंका पाटील, लॉरेन बेल
दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग इलेव्हन
लिझेल ली (यष्टीरक्षक), शफाली वर्मा, लॉरा वुल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (कर्णधार), मारिझान काप, चिनेल हेन्री, निकी प्रसाद, स्नेह राणा, मिन्नू मणी, श्री चरणी, नंदनी शर्मा
वुमन्स प्रीमियर लीग २०२६ च्या फायनलमध्ये आरसीबीने सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. तर दिल्ली कॅपिटल्स फलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल. दोन्ही संघ सारख्याच प्लेईंग इलेव्हनसह खेळणार आहेत.
RCB vs DC WPL Final: RCB दुसऱ्या जेतेपदाच्या प्रतिक्षेत
आरसीबीने यापूर्वी २०२४ मध्ये महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकले होते. आता, आरसीबी त्यांच्या दुसऱ्या ट्रॉफीच्या प्रतिक्षेत आह. स्मृती मानधनाने तिच्या नेतृत्वाखाली एकदा संघाला जेतेपद मिळवून दिलं आहे.
RCB vs DC WPL Final: आरसीबीचा लीग टप्प्यात दबदबा अन् गाठली फायनल
आरसीबीने लीग टप्प्यात त्यांचे पहिले पाच सामने जिंकले आणि त्यानंतर संघाला दोन पराभव पत्करावे लागले, परंतु त्यांचा शेवटचा लीग सामना जिंकून त्यांनी सहा विजय आणि १२ गुणांसह अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं.
WPL Final: आऱसीबी वि. दिल्ली फायनल किती वाजता सुरू होणार?
आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील वुमन्स प्रीमियर लीगचा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. तर नाणेफेक थेट सामन्याच्या अर्धा तास आधी, संध्याकाळी ७:०० वाजता होईल.
RCB vs DC Final: आरसीबी वि. डीसी
स्मृती मानधनाची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वुमन्स प्रीमियर लीग २०२६ चा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

RCB vs DC Live Cricket Score, WPL 2026 Final Today Match Highlights: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वुमन्स प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला गेला. ज्यात आरसीबीने विजय मिळवत दुसऱ्यांदा जेतेपद पटकावलं.

