Jordan Cox Catch: आयपीएल २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण गुजरातला हा निर्णय सार्थ ठरवता आलेला नाही. गुजरातचे फलंदाज या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरले. यादरम्यान वॉशिंग्टन सुंदरला बाद करण्यासाठी जॉर्डन कॉक्सने भन्नाट झेल घेतला. पण या झेलवरुन चांगलाच वाद पेटला आहे. अंपायरने रिप्लेमध्ये पाहिल्यानंतर त्याला नॉट आउट घोषित करण्यात आलं. यावरून कर्णधार रजत पाटीदार नाराजी व्यक्त करताना दिसून आला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
तर झाले असे की, गुजरात टायटन्सकडून ९ वे षटक टाकण्यासाठी जेकब डफी गोलंदाजीला आला. त्यावेळी वॉशिंग्टन सुंदर फलंदाजी करत होता. डफीने मिडल आणि ऑफ स्टंपवर शॉर्ट चेंडू टाकला. या चेंडूवर वॉशिंग्टनने पूल शॉट मारला.
पाम चेंडू आणि बॅटचा हवा तसा संपर्क झाला नाही. त्यामुळे चेंडू बॅटची कडा घेऊन हवेत गेला. त्यावेळी जॉर्डन कॉक्सने डाईव्ह मारून झेल घेतला. पण अंपायरला चेंडू आणि जमिनीचा संपर्क झाल्याचा संशय आला, त्यामुळे हा निर्णय तिसऱ्या अंपायरकडे पटवण्यात आला. रिप्लेमध्ये पाहिल्यानंतर स्पष्टपणे दिसून आलं की, झेल घेताना चेंडू हातात असताना चेंडू आणि जमिनीचा संपर्क झाला आहे. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरला नाबाद घोषित करण्यात आलं. पण रजत पाटीदारला हा निर्णय चुकीचा वाटला. यावरून रजत पाटीदार आणि अंपायर यांच्यात चर्चा पाहायला मिळाली.
या सामन्यात गुजरात टायटन्सचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. पण या महत्वाच्या सामन्यात या जोडीला हवी तशी सुरुवात करुन देता आली नाही. साई सुदर्शन अवघ्या १२ धावा करुन माघारी परतला. तर शुबमन गिल १० धावांवर बाद झाला. त्यानंतर निशांत सिंधूने २० धावा केल्या. जोस बटलर अवघ्या १९ धावांवर माघारी परतला. अर्शद खान १५ धावांवर बाद झाला. तर वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ५० धावा केल्या. या खेळीच्या बळावर गुजरात टायटन्सने ८ गडी बाद १५५ धावा केल्या.
