Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Highlights: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. चेसमास्टर विराटच्या नाबाद ७५ धावांच्या बळावर व गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीसह आरसीहीने गुजरातचा ५ विकेट्सने पराभव केला. आरसीबी आता चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स यांच्यानंतर सलग दोन वर्षे आयपीएलचं जेतेपद पटकावणारा तिसरा संघ ठरला.

Live Updates

RCB vs GT IPL 2026 Final Highlights: आयपीएल २०२६ आरसीबी आणि गुजरात टायटन्स सामन्याचे हायलाईट्स

23:31 (IST) 31 May 2026

Virat Kohli Celebration: विराट कोहलीचं भन्नाट सेलिब्रेशन

विराट कोहलीने संघाला विजयासाठी एका धावेची गरज असताना १८व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर षटकार लगावत सामना जिंकून दिला. विराटच्या या मॅचविनिंग षटकारानंतर त्याने चाहत्यांकडे पाहत हाताने ये अशी खूण केली. गुजरात संघाचं वाक्य 'आवा दे' असं आहे. याच अर्थाने विराटने त्यांना पराभूत केल्यानंतर आवा दे असं सेलिब्रेशन केलं.

23:29 (IST) 31 May 2026

RCB Wins IPL 2026: आरसीबी सलग दुसऱ्यांदा ठरली चॅम्पियन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल २०२६ चा चॅम्पियन ठरला. आरसीबीने गुजरात टायटन्सचा ५ विकेट्सने पराभव केला. चेस मास्टर विराट कोहलीने नाबाद ७५ धावांची उत्कृष्ट खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. रजत पाटीदारच्या नेतृत्त्वाखाली यासह आरसीबीने सलग दुसरं जेतेपद पटकावलं.

23:19 (IST) 31 May 2026

IPL 2026 RCB vs GT Final Live: विराटला जीवदान

अरशद खानच्या गोलंदाजीवर १६व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर विराट कोहलीला शुबमन गिलने झेलबाद केल्याचं दिसलं. पण गिलने झेल टिपल्यानंतर चेंडू लगेच जमिनीला लागला, विराटने पंचांशी बोलत पुन्हा तपासायला लावलं, विराटच्या मते टप्पा पडून चेंडू गेला. पंचांनी तपासल्यानंतर झेल टिपल्यानंतर तो जमिनीला लागल्याचं स्पष्ट दिसलं आणि विराटला नाबाद घोषित केलं. यानंतर विराट गिलजवळ गेला आणि त्याच्याशी बोलताना दिसला.

23:06 (IST) 31 May 2026

IPL 2026 RCB vs GT Final Live: टीम डेव्हिड बाद

अरशद खानने १४व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर टीम डेव्हिडला बाद करत आरसीबीला पाचवा धक्का दिला. आता आरसीबीला ३६ चेंडूत २४ धावांची गरज आहे. विराट कोहली व जितेश शर्माची जोडी मैदानावर आहे.

22:53 (IST) 31 May 2026
RCB vs GT IPL 2026 Final Live Score: विराट कोहलीचं शानदार अर्धशतक

विराट कोहलीने अंतिम सामन्यात २५ चेंडूत ७ चौकार व २ षटकारांसह अर्धशतक झळकावलं. विराट कोहलीने आयपीएल इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावलं आहे. यासह आता आरसीबीला ४८ चेंडूच ४० धावांची गरज आहे.

22:40 (IST) 31 May 2026

IPL 2026 RCB vs GT Final Live: आरसीबीच्या १०० धावा पूर्ण

आरसीबीने १० षटकांत १०० धावांचा पल्ला गाठला आहे. आता संघाला विजयासाठी ५६ धावांची गरज आहे. मैदानावर टीम डेव्हिड व विराट कोहलीची जोडी आहे.

22:33 (IST) 31 May 2026
RCB vs GT IPL 2026 Final Live Score: रशीदच्या षटकाने गुजरातला दिली संजीवनी

नवव्या षटकात गोलंदाजीसाठी रशीद खान आला. रशीद खानने एका षटकात दोन विकेट्स घेत गुजरातला जणू संजीवनी दिली आहे. दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या रूपात रजत पाटीदार झेलबाद झाला. यासह आरसीबीला कर्णधाराच्या रूपात मोठा धक्का बसला. यानंतर पाचव्या चेंडूवर आलेल्या कृणाल पंड्याला त्याने पायचीत करत बाद केलं. यासह अचानक सामन्यात गुजरातने कमबॅक केलं आहे. यासह आरसीबीने ९ षटकांत ४ बाद ९१ धावा केल्या आहेत.

22:16 (IST) 31 May 2026
IPL 2026 RCB vs GT Final Live: देवदत्त पडिक्कल स्वस्तात माघारी

कगिसो रबाडाने सहाव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर देवदत्त पडिक्कलला झेलबाद करत आरसीबीला मोठा धक्का दिला. यासह पॉवरप्लेमध्ये आरसीबीने २ बाद ७० धावा केल्या आहेत.

22:10 (IST) 31 May 2026

IPL 2026 RCB vs GT Final Live: आरसीबीला पहिला धक्का

मोहम्मद सिराजची धुलाई झाल्यानंतर अखेरीस त्याने पाचव्या षटकात वेंकटेश अय्यरला झेलबाद केलं. वेंकटेश झटपट ३२ धावा करत बाद झाला. यासह आरसीबीने आतापर्यंत ६२ धावा केल्या आहेत.

22:05 (IST) 31 May 2026

IPL 2026 RCB vs GT Final Live: आरसीबीच्या ५० धावा पूर्ण

३.३ षटकांतच आरसीबीने ५० धावा पूर्ण केल्या आहेत. चौथ्या षटकात विराट कोहलीने कगिसो रबाडाला हतबल करून सोडलं. विराटने पहिल्या दोन चेंडूंवर २ चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर अजून एक चौकार लगावत १९ धावा कुटल्या. यासह ४ षटकांत आरसीबीने बिनबाद ५५ धावा केल्या आहेत.

21:58 (IST) 31 May 2026

IPL 2026 RCB vs GT Final Live: रबाडाची धुलाई

दुसऱ्या षटकात वेंकटेश अय्यरने कगिसो रबाडाची धुलाई केली. नीट उभं राहण्यासही जमत नसलेल्या वेंकटेशने ३ चौकार एक षटकार खेचला आणि १८ धावा कुटल्या. यासह आरसीबीने २ षटकांत बिनबाद २३ धावा केल्या आहेत.

21:51 (IST) 31 May 2026

IPL 2026 RCB vs GT Final Live: आरसीबीची रनचेसला सुरूवात

गुजरातने दिलेल्या १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी विराट कोहली व वेंकटेश अय्यरची जोडी मैदानावर उतरली आहे. तर मोहम्मद सिराजने गोलंदाजीला सुरूवात केली आहे. पहिल्या षटकात आरसीबीने बिनबाद ५ धावा केल्या आहेत.

21:33 (IST) 31 May 2026

IPL 2026 Closing Ceremony: आयपीएल २०२६च्या क्लोजिंग सेरेमनील सुरूवात

आयपीएल २०२६च्या क्लोजिंग सेरेमनीला सुरूवात झाली आहे. गायक पद्मश्री पुरस्कार विजेते गायक कैलाश खेर परफॉर्मन्स सादर करत आहेत.

21:22 (IST) 31 May 2026
IPL 2026 RCB vs GT Final Live: आरसीबीला विजयासाठी इतक्या धावांचं लक्ष्य

अंतिम सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरातच्या धावांवर चांगलंच नियंत्रण ठेवलं. वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतकी खेळी करत कडवी झुंज दिली, पण आरसीबीच्या गोलंदाजांनी खरी बाजी मारली. यासह गुजरात टायटन्सने २० षटकांत ८ विकेट्स गमावत १५५ धावा केल्या आणि आरसीबीला विजयासाठी १५६ धावांचं मोठं योगदान दिलं आहे.

21:18 (IST) 31 May 2026

Washington Sundar Fifty: वॉशिंग्टनची कडवी झुंज

वॉशिंग्टन सुंदरने कडवी झुंज देत 37 चेंडूत अर्धशतक करत गुजरातसाठी महत्त्वपूर्ण धावा केल्या आहेत.

21:17 (IST) 31 May 2026

IPL 2026 RCB vs GT Final Live: रसिखच्या खात्यात तिसरी विकेट

रसिख दार २०वं षटक टाकण्यासाठी आला आणि त्याच्या पहिल्याच चेंडूवर रशीद खानने षटकार खेचला आणि गुजरातला १५० धावांच्या पलीकडे नेलं. यानंतर पुढच्या चेंडूवर रशीद शॉर्ट बॉलवर झेलबाद झाला. यासह रसिख सलाम दारने अंतिम सामन्यात ३ विकेट्स घेतल्या आहेत.

21:12 (IST) 31 May 2026

RCB vs GT IPL 2026 Final Live Score: होल्डर झेलबाद

भुवनेश्वर कुमारने १९व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर जेसन होल्डरला झेलबाद करवत संघाला सातवी विकेट मिळवून दिली. आतापर्यंत संघाने ७ बाद १४२ धावा केल्या आहेत.

21:11 (IST) 31 May 2026

IPL 2026 RCB vs GT Final Live: वॉशिंग्टनची झुंजार खेळी

वॉशिंग्टन सुंदरने जोश हेझलवूडच्या १८व्या षटकात ३ चौकार मारत १६ धावा कुटल्या. यानंतर त्याने १९व्या षटकातही पहिल्या चेंडूवर चौकार लगावत गुजरातसाठी महत्त्वपूर्ण धावा करत आहे.

21:00 (IST) 31 May 2026

IPL 2026 RCB vs GT Final Live: राहुल तेवतिया झेलबाद

१७व्या षटकात रसिख सलाम दारच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात राहुल तेवतिया झेलबाद झाला. गुजरातसाठी अखेरच्या षटकात मोठे फटके खेळत धावांची गरज होती, त्यादरम्यान तेवतिया झेलबाद झाल्याने गुजरातसाठी मोठा धक्का बसला.

20:47 (IST) 31 May 2026

RCB vs GT IPL 2026 Final Live Score: अरशद खान झेलबाद

रजत पाटीदारने १५वं षटक टाकण्यासाठी हेझलवूडला पाचारण केलं आणि दोन षटकारांसह गुजरातच्या दिशेने सामना वळवू पाहत होता. पण हेझलवूडने पहिल्याच चेंडूवर झेलबाद करत त्याला माघारी धाडलं.

20:41 (IST) 31 May 2026

IPL 2026 RCB vs GT Final Live: जोस बटलर झेलबाद

कृणाल पंड्याने १३व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर आरसीबीला मोठी विकेट मिळवून दिली. कृणालच्या गोलंदाजीवर स्टेप आऊट करत खेळताना स्टंपिंग होत माघारी परतला. नंतर आलेल्या अरशद खानने षटकार लगावत ४० चेंडूंनंतर गुजरातसाठी बाऊंड्री मारली. यासह १३ षटकांत गुजरातने ४ बाद ८३ धावा केल्या आहेत.

20:31 (IST) 31 May 2026
RCB vs GT IPL 2026 Final Live Score: वॉशिंग्टन नाबाद कसा

१०व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर जॉर्डन कॉक्सने वॉशिंग्टनला झेलबाद केलं होतंच पण तिसऱ्या पंचांनी नाबाद घोषित केलं. पंचांच्या मते चेंडू जमिनीला कॅच पूर्ण होण्यापूर्वी चेंडू जमिनीला लागला होता, त्यामुळे तिसऱ्या पंचांनी नाबाद घोषित केलं. कॉक्सने झेल टिपल्यावर त्याचा तोल गेला आणि त्यादरम्यान चेंडू जमिनीला लागला, पण त्याच्या हाताची बोटं चेंडू खाली होती. यावरून रजत पाटीदार व विराट कोहली पंचांशी चर्चा करताना दिसले.

20:15 (IST) 31 May 2026

IPL 2026 RCB vs GT Final Live: आरसीबीच्या खात्यात तिसरी विकेट

८व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर रसिख सलाम दारने चांगली फलंदाजी करणाऱ्या निशांत सिंधूला झेलबाद केलं. निशांत २० धावा करत बाद झाला. यासह संघाने ८ षटकांत ३ बाद ५५ धावा केल्या आहेत.

20:06 (IST) 31 May 2026
RCB vs GT IPL 2026 Final Live Score: पॉवरप्ले

शुबमन गिल व साई सुदर्शनच्या विकेट्स गमावल्यानंतर आता गुजरातने पॉवरप्लेमध्ये २ बाद ४५ धावा केल्या आहेत. भुवनेश्वर कुमार व जोश हेझलवूडने दोन्ही फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या. यानंतर जोस बटलर व निशांत सिंधु यांनी संघाचा डाव सावरला आहे.

19:53 (IST) 31 May 2026
RCB vs GT Final Live: साई सुदर्शन तंबूत

भुवनेश्वर कुमार चौथं षटक टाकण्यासाठी परतला आणि त्याने साई सुदर्शनला कमालीच्या गोलंदाजीवर झेलबाद केलं. साईदेखील शुबमन गिलप्रमाणेच बाद झाला. यासह गुजरातने ४ षटकंत २ बाद ३० धावा केल्या आहेत. आता मैदानात जोस बटवर व निशांत सिंधुची जोडी मैदानावर आहे.

19:52 (IST) 31 May 2026

RCB vs GT IPL 2026 Final Live Score: आरसीबीच्या खात्यात पहिली विकेट

हेझलवूडने तिसऱ्या षटकात आरसीबीला मोठी विकेट मिळवून दिली आहे. हेझलवूड यंदा फारसा फॉर्मात नसला तरी त्याने अंतिम सामन्यात संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला आहे. हेझलवूडच्या पहिल्या चेंडूवर त्याने जबरदस्त चौकार घेतला आणि दुसरा चेंडू बॅटची कड घेत हवेत उंच उडाला आणि रजत पाटीदारने धावत येत कमालीचा झेल टिपला.

19:34 (IST) 31 May 2026
RCB vs GT Final Live: सामन्याला सुरूवात

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याला सुरूवात झाली आहे. गुजरातकडून साई सुदर्शन व शुबमन गिल ही जोडी उतरली आहे. तर आरसीबीकडून जेकब डफी गोलंदाजी करत आहे. पहिले दोन चेंडू निर्धाव राहिल्यानंतर साईने दोन कमालीचे चौकार लगावले आहेत. याशिवाय डफीने ३ वाईड टाकले. यासह पहिल्या षटकात गुजरातने १३ धावा केल्या आहेत.

19:26 (IST) 31 May 2026

RCB vs GT IPL 2026 Final Live Score: दोन्ही संघ सज्ज

आयपीएलचं दुसरं जेतेपद पटकावण्यासाठी आरसीबी व गुजरात दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानावर दाखल झाले आहेत.

19:10 (IST) 31 May 2026
RCB vs GT Final Live Score: गुजरातची प्लेईंग इलेव्हन

साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, निशांत सिंधू, जेसन होल्डर, रशीद खान, कागिसो रबाडा, अर्शद खान, मोहम्मद सिराज

19:09 (IST) 31 May 2026

RCB vs GT Final Live Score: आऱसीबीची प्लेईंग इलेव्हन

विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, जोश हेजलवुड, रसिक सलाम दार

IPL 2026 Final Highlights RCB vs GT: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गुजरातचा पराभव करत आयपीएल ट्रॉफीवर सलग दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आहे.