IPL 2026 RCB vs MI Highlights in Marathi: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मुंबई इंडियन्सचा अखेरच्या चेंडूवर २ विकेट्सने पराभव केला. या पराभवासह मुंबई इंडियन्सचा संघ अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. यासह आरसीबीने १४ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. आता आरसीबी प्लेऑफपासून फक्त एक पाऊल दूर आहे.
IPL 2026 Royal Challengers Bengaluru vs Mumbai Indians Highlights 10 may 2026: आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याचे हायलाईट्स
MI vs RCB Live: अखेरच्या षटकात काय घडलं?
सूर्यकुमार यादवने अखेरचं षटक टाकण्याची जबाबदारी राज अंगद बावाकडे दिली. राजला १५ धावा वाचवायच्या होत्या. राजने पहिला चेंडू वाईड, त्यानंतर नो बॉल टाकला. त्यानंतर पहिल्या चेंडूवर एक धाव मिळाली. त्यानंतर दुसरा चेंडू वाईड टाकला. यानंतर दुसरा लीगल चेंडू निर्धाव राहिला. तिसऱ्या लीगल चेंडूवर शेफर्ड झेलबाद झाला. त्यानंतर चौथा चेंडू पुन्हा वाईड यॉर्करच्या प्रयत्नात वाईड पडला. त्यानंतर मैदानावर आलेल्या भुवनेश्वरने एक षटकार लगावत सामना फिरवला. यानंतर २ चेंडूत ३ धावांची गरज होती. पाचव्या चेंडूवर भुवीने एक धाव घेतली. त्यानंतर रसिख सलामने स्ट्रेट मारलेला चेंडू राज थांबताना चुकला, त्यामुळे रसिखने २ धावा केल्या. त्यामुळे मुंबईने २ विकेट्सने सामना गमावला. यासह मुंबई स्पर्धेतून बाहेर झाली आहे.
मुंबई इंडियन्सने अखेरच्या षटकात १५ धावा डिफेंड करण्याची जबाबदारी राज अंगद बावाला दिली होती. शेफर्ड तिसऱ्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर आलेल्या भुवनेश्वर कुमारने षटकार लगावत सामना अगदी बरोबरीत आणला.
RCB vs MI live: गझनफरचं नाट्यमयी षटक
गझनफरच्या १८व्या षटकात कृणालने मोठा फटका खेळला आणि सीमारेषेवर नमन धीरने झेल टिपला, पण त्याचा तोल जाणार कळताच त्याने तिलकच्या दिशेने चेंडू फेकला. पण तिलकने चेंडू टिपला नाही आणि मैदानावर पडला. त्यानंतर कृणालने दोन षटकार मारले आणि संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. क्रॅम्प येत असतानाही संघासाठी त्याने महत्त्वपूर्ण खेळी हे खऱंच वाखाणण्याजोग होतं. त्यानंतर अखेरच्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तिलक वर्माने बनी हॉप कॅच टिपत त्याला झेलबाद केलं.
RCB vs MI live: टीम डेव्हिड गोल्डन डकवर बाद
जितेश शर्माला बाद केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर कार्बिन बॉशने टीम डेव्हिडला बाद करत मुंबईला मोठी विकेट मिळवून दिली. यासह बॉशने सामन्यात ४ विकेट्स घेतल्या.
कार्बिन बॉशच्या १६व्या षटकात दोन षटकार आल्यानंतर जितेश शर्मा अजून एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. यासह आता आऱसीबीला विजयासाठी २५ चेंडूत ३६ धावांची गरज आहे.
RCB vs MI live: कृणाल पंड्याचं अर्धशतक
कृणाल पंड्याने ३२ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांसह अर्धशतक झळकावलं. यासह त्याने संघाचा डाव सावरला आहे.
RCB vs MI live: बॉशच्या खात्यात दुसरी विकेट
कार्बिन बॉश १३ व्या षटकात फलंदाजीला आला आणि पुन्हा एकदा त्याने पहिल्या चेंडूवर विकेट घेत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. जेकब बेथल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.
RCB vs MI live Cricket Score: रजत पाटीदार फेल
रजत पाटीदार गेल्या ३ वर्षांत मुंबईसमोर अर्धशतकी खेळी साकारल्या आहेत. त्यामुळे कर्णधार पाटीदारकडून आरसीबीला महत्त्वपूर्ण खेळीची अपेक्षा होती. पण कार्बिन बॉशच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रजत पाटीदार झेलबाद झाला. यासह ६ षटकांत पॉवरप्लेमध्ये आरसीबीने ३ बाद ४८ धावा केल्या आहेत.
दीपक चहर तिसरं षटक टाकण्यासाठी आला, त्याने सुरूवातीचे चारही चेंडू देवदत्त पडिक्कलला डॉट टाकले. यानंतर पाचव्या शॉर्ट बॉलवर त्याने दणदणीत षटकार खेचला. यानंतर सहाव्या चेंडूवर चहरने कमालीच्या लाईन लेंग्थसह चेंडू टाकत पडिक्कलला झेलबाद केलं. यासह आरसीबीची अवस्था ३ षटकांत २ बाद २४ धावा अशी आहे.
RCB vs MI live Cricket Score: विराट गोल्डन डकवर बाद
मुंबईने दिलेल्या १६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या रूपात संघाला मोठा धक्का बसला. दीपच चहरच्या पहिल्या दोन चेंडूंवर चौकार मारत बेथलने सुरूवात केली. त्यानंतर चौथ्या चेंडूवर फटका खेळायला गेला आणि बाऊन्समुळे चेंडू उंच उडाला व राज बावाने स्वत:ला योग्य जागी आणत कमाल झेल टिपला. यासह विराट सलग दुसऱ्यांदा गोल्डन डकवर झेलबाद झाला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत मुंबईच्या धावांना चांगलाच ब्रेक लावला. रसिख सलाम दरने तर अखेरच्या चेंडूत मुंबईला एकही मोठा फटका खेळण्याच्या संधी मिळाली नाही. भुवनेश्वर कुमारने ४ विकेट्स घेत तर मुंबईच्या फलंदाजी फळीचं कंबरडं मोडलं. यासह मुंबईने नमन धीरच्या व तिलक वर्माच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर २० षटकांत ७ बाद १६६ धावा केल्या आहेत. यासह आरसीबीला विजयासाठी फक्त १६७ धावांचं लक्ष्य दिलं आहे.
RCB vs MI live Cricket Score: तिलक वर्मा क्लीन बोल्ड
तिलक वर्माने अर्धशतकी खेळी करत मुंबईचा डाव सावरला, त्यामुळे अखेरच्या षटकांमध्ये सेट झालेला फलंदाज मैदानावर असणं मुंबईसाठी महत्त्वाचं होतं. पण भुवनेश्वर कुमारच्या १८व्या षटकात लॅप शॉट खेळण्यात चूक केल्याने तिलक क्लीन बोल्ड झाला आणि आरसीबीला महत्त्वाची विकेट मिळाली.
RCB vs MI Live: तिलक वर्माचं अर्धशतक
तिलक वर्माने संघाचा डाव सावरत सावधपणे फलंदाजी करत आपलं अर्धशतक केलं आहे. तिलकने ३७ चेंडूत २ चौकार व २ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केलं.
RCB vs MI Live: मुंबईचा निम्मा संघ माघारी
१६व्या षटकात रोमारियो शेफर्डने विल जॅक्सला झेलबाद करत मुंबईला पाचवा मोठा धक्का दिला. जॅक्स १० चेंडूत १० धावा करत माघारी परतला. यासह मुंबईने १५.२ षटकांत १३२ धावा केल्या आहेत.
RCB vs MI Live: नमन धीर क्लीन बोल्ड
रसिख सलाम दर १३वं षटक टाकण्यासाठी आला, नमन धीरने षटकाच्या सुरूवातीच्या दोन चेंडूत चौकार खेचले आणि तिसऱ्या चेंडूवर रसिखने त्याला क्लीन बोल्ड केलं. नमन चेंडू खेळायला चुकला आणि बोल्ड होत माघारी परतला. नमन ३२ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह ४७ धावा करत बाद झाला. तर मुंबईचा डाव सावरणारी तिलक व नमनची ५७ चेंडूत केलेली ८२ धावांची भागीदारी मोडली.
RCB vs MI live Cricket Score: १० षटकांत मुंबईच्या इतक्या धावा
पॉवरप्लेमध्ये ३ विकेट्स गमावल्यानंतर तिलक वर्मा व नमन धीर यांनी संघाचा डाव सावरला आहे. यासह मुंबईने १० षटकांत ८२ धावा केल्या आहेत. नमन २८ धावा तर तिलक २५ धावांवर खेळत आहे.
मुंबई इंडियन्सने पॉवरप्लेमध्ये ३ विकेट्स गमावत सुरूवात केली. तरीही मुंबईने ६ षटकांत ५३ धावा केल्या आहेत. नमन धीर व तिलक वर्माच्या जोडीने संघाचा डाव सावरला.
भुवनेश्वर कुमारने तिसऱ्या षटकात रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव झेलबाद झाल्याने मुंबईला मोठा धक्का बसला. नकल चेंडूवर रोहित शर्मा फटका खेळायला गेला, पण चेंडू बॅटची कड घेत माघारी परतला, यानंतर पुढच्या चेंडूवर स्लिपमध्ये सूर्या झेलबाद झाला. यासह भुवनेश्वरने २ चेंडूत २ विकेट्स घेतल्या. यासह मुंबईने ३ षटकांत ३ बाद २८ धावा केल्या आहेत.
RCB vs MI live Cricket Score: हिटमॅनची आक्रमक फलंदाजी
रोहित शर्माने जोश हेझलवूडच्या षटकात वादळी फटकेबाजी केली. रोहितने दुसऱ्या चेंडूवर चौकार व अखेरच्या दोन चेंडूंवर दोन षटकार लगावत संघाला दणक्यात सुरूवात करून दिली.
RCB vs MI live Cricket Score: मुंबईला पहिला धक्का
भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सला पहिला धक्का दिला आहे. भुवनेश्वरने पहिल्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर रायन रिकल्टनला झेलबाद केलं. यासह ४ धावांवर मुंबईला मोठा धक्का बसला. रिकलटन २ धावा करत बाद झाला.
RCB vs MI live Cricket Score: सामन्याला सुरूवात
मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यातील सामन्याला सुरूवात झाली आहे. मुंबईकडून रोहित शर्मा व रायन रिकल्टनची जोडी मैदानावर उतरली आहे. तर स्विंगचा किंग भुवनेश्वर कुमारने गोलंदाजीला सुरूवात केली आहे.
RCB vs MI: आरसीबीची प्लेईंग इलेव्हन
विराट कोहली, जेकब बेथेल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा, रसिक सलाम दार
RCB vs MI Live: मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), नमन धीर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, विल जॅक्स, राज अंगद बावा, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, एएम गझनफर
RCB vs MI live Cricket Score: नाणेफेक
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूतील रायपूर सामन्याची नाणेफेक आरसीबीने जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्स फलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार.
RCB vs MI live Cricket Score: हार्दिक सामन्याबाहेर
आयपीएल २०२६ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध सामन्याच्या नाणेफेकीसाठी सूर्यकुमार यादव आला, त्यामुळे या सामन्यातही मुंबईचं नेतृत्त्व सूर्यकुमार यादव करणार आहे. हार्दिक पंड्या आरसीबीविरूद्ध खेळताना दिसणार नाही.
RCB vs MI Live: हेड टू हेड
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत एकूण ३५ सामने खेळले गेले आहेत. यापैकी मुंबईने १९ सामने जिंकले असून, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने १६ सामने जिंकले आहेत. या हंगामातील दोन्ही संघांमधील ही दुसरी लढत आहे; मागच्या वेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने विजय मिळवला होता.

Royal Challengers bengaluru vs Mumbai Indians Highlights: आरसीबीने अखेरच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सचा पराभव करत गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. तर मुंबईचा संघ स्पर्धेतून अधिकृतरित्या बाहेर झाला आहे.
