ला लिगा जेतेपदाची शक्यता मावळली
ला लिगा फुटबॉल स्पर्धा
प्रतिष्ठेच्या ला लिगा फुटबॉल स्पर्धेसाठी बार्सिलोना आणि रिअल माद्रिद यांच्यात जबरदस्त मुकाबला रंगतो. मात्र इस्पॅनयोलविरुद्धची लढत बरोबरीत सुटल्याने रिअल माद्रिदच्या जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेल्याचे चित्र आहे. या पराभवामुळे रिअल माद्रिद गुणतालिकेत बार्सिलोनापेक्षा १३ गुणांनी पिछाडीवर गेला आहे.
दुसरीकडे जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या बार्सिलोनाने अ‍ॅटलेटिको माद्रिदवर ४-१ने विजय मिळवत जेतेपदाच्या दिशेने आणखी एक दमदार पाऊल टाकले.
जेतेपद मिळवणे फार अवघड आहे, पहिल्यांदाच अशा परिस्थितीत मी सापडलो आहे जेव्हा उद्दिष्टापासून आम्ही खुप दूर गेलो आहोत असे रिअलचे प्रशिक्षक जोस मॉर्निन्हो यांनी सांगितले.
इस्पॅनयोलच्या सर्जिओ गार्सियाने ३१व्या मिनिटाला गोल केला. मध्यंतरानंतर रिअलतर्फे ख्रिस्तियानो रोनाल्डोने गोल करत बरोबरी करून दिली. चार मिनिटांनंतर फॅबिओ कोइनट्राओने गोल झळकावत रिअलला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. मात्र सामना संपायला काही मिनिटे असताना इस्पॅनयोलतर्फे ज्युऑन अँजेल अल्बिनने गोल करत बरोबरी करून दिली.