‘नव्या नियमांमुळे खेळाडूंची कसोटी’

२ जानेवारीपासून पीबीएलला सुरुवात होणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

प्रीमिअर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) १५ गुणांच्या नव्या नियमांमुळे प्रत्येक सामना रंगतदार होणार आहे. त्यामुळे खेळाडूंची खरी कसोटी लागणार आहे, असे मत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने व्यक्त केले. २ जानेवारीपासून पीबीएलला सुरुवात होणार आहे.

‘‘काही नवीन नियमांमुळे ही लीग मनोरंजक होणार आहे. या नियमांमुळे आमचा कस लागणार आहे. १५ गुणांमुळे प्रत्येक गेमवर पकड कायम राखणे गरजेचे आहे.  प्रत्येक दिवशी गुणतालिकेत नवीन संघ आघाडीवर गेलेला पाहायला मिळेल,’’ असे सिंधू म्हणाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Real test of player due to new rule sindhu

ताज्या बातम्या