scorecardresearch

Premium

पीटरसनच्या कारकिर्दीचा वादग्रस्त पद्धतीने अस्त!

इंग्लिश संघाचा तो तारणहार.. त्याच्या तडाखेबंद फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळाले.. भारताच्या गोलंदाजांवर त्याने नेहमीच हुकूमत गाजवली..

पीटरसनच्या कारकिर्दीचा वादग्रस्त पद्धतीने अस्त!

इंग्लिश संघाचा तो तारणहार.. त्याच्या तडाखेबंद फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळाले.. भारताच्या गोलंदाजांवर त्याने नेहमीच हुकूमत गाजवली.. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात तो इंग्लंडतर्फे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.. गेली नऊ वर्षे इंग्लंडच्या यशात त्याने मोलाची भूमिका बजावली.. मैदानावर आणि मैदानाबाहेरील अनेक वादग्रस्त प्रकरणांमुळे तो गोत्यात आला.. अ‍ॅशेस मालिकेतील दारुण पराभवानंतर त्याची कारकीर्दही वादग्रस्त पद्धतीने संपुष्टात आली. इंग्लंडचा आगामी वेस्ट इंडिज दौरा आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी त्याचा विचार न करण्याचे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) ठरवल्यानंतर पीटरसनने आपली कारकीर्द संपुष्टात आल्याचे बुधवारी जाहीर केले.
अ‍ॅशेस मालिकेतील इंग्लंडच्या पराभवानंतर ईसीबीने संघात मोठे बदल करण्याचे ठरवले होते. इंग्लंडला यशोशिखरावर नेणारे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी राजीनामा देऊन या बदलाचे संकेत दिले होते. त्यानंतर ईसीबीने आता पीटरसनचा ‘बळी’ मिळवला. १०४ कसोटी आणि १३६ एकदिवसीय सामन्यांनंतर पीटरसनचे इंग्लिश संघाशी असलेले नऊ वर्षांचे नाते संपुष्टात आले. पीटरसनने कसोटीत ४७.२८च्या सरासरीने ८१८१ तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४०.७३च्या सरासरीने ४४४० धावा केल्या आहेत. ३७ ट्वेन्टी-२० सामन्यांत त्याने ११७६ धावा काढल्या आहेत.
ईसीबीने बळजबरीने पीटरसनची कारकीर्द संपुष्टात आणल्यानंतर त्याने आपली निवृत्ती जाहीर केली. ‘‘एक क्रिकेटपटू म्हणून मी घेतलेला निवृत्तीचा निर्णय योग्यच आहे. यापुढेही मला खेळायचे होते, पण इंग्लंड संघाकडून खेळणे शक्य होणार नसल्याचा खेद होत आहे,’’ असे पीटरसनने सांगितले.
इंग्लंडचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक पॉल डॉनटन म्हणाले, ‘‘पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंड संघाची बांधणी करण्याकरिता पीटरसनला डच्चू देण्याचा निर्णय घेणे कठीण गेले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भविष्यासाठी योग्य रणनीती आखण्याची गरज होती. आता इंग्लंडच्या संघबांधणीची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. पीटरसनने इंग्लिश क्रिकेटसाठी दिलेले योगदान मौल्यवान आहे.’’

इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व करणे, हा माझ्यासाठी बहुमान होता. खाचखळग्यांनी भरलेला प्रवास अचानक संपल्याने मी निराश होणे स्वाभाविक आहे. पण गेल्या नऊ वर्षांत एक खेळाडू म्हणून आणि संघासाठी जे उद्दिष्ट साध्य केले, त्याचा मला अभिमान वाटत आहे. ज्या काळात इंग्लंडने सर्वोत्तम क्रिकेटपटू जगाला दिले आणि सर्वाधिक यश मिळवले, त्या काळाचा साक्षीदार असल्याने मी स्वत:ला नशीबवान समजतो. चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. त्याचबरोबर इंग्लंड संघाला भविष्यात चांगले यश मिळो, यासाठी माझ्याकडून शुभेच्छा! केव्हिन पीटरसन
‘अवलि’या!

tanushree dutta on rakhi sawant
“तिने पाच लग्नं केलीत, पण…” तनुश्री दत्ताची राखी सावंतवर टीका; म्हणाली, “तिला पुरुष…”
manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?
disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2014 at 04:15 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×