बार्सिलोना : बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद दरम्यान बुधवारी झालेल्या महिला चॅम्पियन्स लीग फुटबॉलमधील सामन्यादरम्यान कॅम्प नोऊ स्टेडियममध्ये विक्रमी ९१ हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. बार्सिलोनाने हा सामना ५-२ असा जिंकत उपस्थित प्रेक्षकांच्या आनंदात आणखी भर घातली. या सामन्यासाठी ९१,५५३ प्रेक्षकांची नोंद झाली आहे. यापूर्वी अमेरिका आणि चीन यांच्यात १९९९च्या महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यास प्रेक्षकसंख्येचा विक्रम नोंदला गेला होता. त्या सामन्यासाठी रोज बाऊल स्टेडियमवर ९०,१८५ प्रेक्षक उपस्थित होते.