IPL मध्ये ‘रांची’चा संघ उतरणार मैदानात? ‘या’ सहा शहरांची नावेही शर्यतीत

आयपीएलमध्ये दोन नवीन संघ येणार आहेत, त्यासाठी स्पर्धक शहरांची नावे समोर आली आहेत.

Reports bcci shortlists six cities for new franchises in ipl 2022
आयपीएल २०२२

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल ही क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी मेजवानीच असते. पुढच्या वर्षी या लीगमध्ये आठऐवजी दहा संघ सहभागी होणार आहेत. दोन नवीन संघ खरेदी करण्याची तयारी सुरू झाली आहे. बीसीसीआयने या शर्यतीत सहा शहरे ठेवली आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, लखनऊ आणि अहमदाबाद व्यतिरिक्त, बीसीसीआयने रांची, कटक, गुवाहाटी आणि धर्मशाला यांचाही स्पर्धक शहरांमध्ये समावेश केला आहे. आता दोन नवीन फ्रेंचायझी कोणत्या शहराशी संबंधित असतील, हे बोलीच्या आधारे ठरवले जाईल.

क्रिकबझच्या अहवालानुसार, बीसीसीआय आयपीएलमधील हिंदी भाषिक क्षेत्रात आयपीएलचे सर्वाधिक प्रेक्षक आहेत. गेल्या वर्षी आयपीएलचे ६५ टक्के प्रेक्षक हिंदी भाषिक प्रदेशातील होते. लखनऊ, रांची, धर्मशाला ही हिंदी भाषिक क्षेत्रे आहेत.

बीसीसीआयने अद्याप बोलीची तारीख जाहीर केलेली नाही, यासाठी एक महिन्याचा कालावधी लागेल असे मानले जात आहे. बीसीसीआयने निश्चितपणे आयपीएल संघांची मूळ किंमत निश्चित केली आहे. दोन्ही नवीन संघांची मूळ किंमत २००० कोटी असणार आहे.

हेही वाचा – ENG vs IND : टीम इंडियाला धक्क्यावर धक्के; आधी शास्त्रींना झाला करोना आणि आता…

आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलने निविदा प्रक्रियेद्वारे बोली आमंत्रित केल्या आहेत. यात काही नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत. पात्रता सिद्ध करणे, बोली सादर करण्याची प्रक्रिया, प्रस्तावित नवीन संघांचे अधिकार आणि दायित्वे इत्यादी घटक ‘निविदा आमंत्रण’मध्ये समाविष्ट आहे, जे नॉन-रिफंडेबल शुल्काची भरपाई मिळाल्यावर उपलब्ध केले जातील. हे शुल्क १० लाख रुपये इतके असेल. तसेच यात वस्तू आणि सेवा कराचाही समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Reports bcci shortlists six cities for new franchises in ipl 2022 adn