वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ख्रिस गेलने बुधवारी भारताला ७३व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘युनिव्हर्स बॉस’ अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या भारतात करोडो चाहते आहेत. आयपीएल स्पर्धेमुळे त्याची लोकप्रियता घराघरात पोहोचली. गेलने शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने गेलने एक ट्वीट केले. तो म्हणाला, ”मी भारतीयांना ७३व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक संदेशामुळे जाग आली. यामध्ये त्यांनी भारतीयांशी असलेले माझे घनिष्ठ संबंध आणि जिव्हाळा याचा उल्लेख केला होता. युनिव्हर्स बॉसकडून तुमचे सर्वांचे अभिनंदन आणि प्रेम.”

क्रिकेटरसिकांना ख्रिस गेलला आयपीएलमध्ये खेळताना पाहायला आवडते. त्याने या स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्स (KKR), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने बंगळुरू संघासाठी ९१ सामने खेळले, ज्यामध्ये त्याने १५४.४०च्या स्ट्राइक रेटने ३४२० धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सनंतर आरसीबीसाठी सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा खेळाडू आहे.

हेही वाचा – Republic Day 2022: संपूर्ण जगाने अनुभवलं भारताचं सामर्थ्य आणि संस्कृती; सैन्यदलांची साहसी प्रात्यक्षिकं

आयपीएलचा सुपरस्टार असलेल्या गेलने यंदाच्या हंगामात मात्र लिलावासाठी नाव नोंदवलेले नाही. गेल सध्या आंतरराष्ट्रीय करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Republic day 2022 chris gayle thank pm narendra modi for wishes adn
First published on: 26-01-2022 at 13:48 IST