आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने १७ वर्षांखालील गटाची विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्याची संधी भारताला दिली आहे. आता या खेळास आपल्या देशात लोकप्रियतेबाबत अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी संघटकांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
भारतात २०१७ मध्ये ही विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. त्या निमित्ताने फुटबॉल महासंघाने या खेळाच्या विकासाकरिता काही ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगून पटेल म्हणाले, वरिष्ठ गटाच्या २०२२ मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील मुख्य फेरीत स्थान मिळविण्याचे लक्ष्य आम्ही खेळाडूंपुढे ठेवणार आहोत.