scorecardresearch

“निवृत्तीची योजना बाहेर फुटणारच होती म्हणून घाईघाईने मी निवृत्ती जाहीर केली”, रॉजर फेडररचे विधान

फेडरर म्हणाला, त्याला प्रथम त्याची औपचारिक घोषणा करायची होती. मला कळले की माझी निवृत्ती योजना लीक होणार आहे. त्यामुळे तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय आधीच जाहीर करावा लागला.

“निवृत्तीची योजना बाहेर फुटणारच होती म्हणून घाईघाईने मी निवृत्ती जाहीर केली”, रॉजर फेडररचे विधान
संग्रहित छायाचित्र (इंडियन एक्सप्रेस)

दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या लेव्हर चषक स्पर्धेनंतर टेनिसला अलविदा करणार आहे. मात्र, आपण टेनिसचे इतिहास बनणार नाही, अशी ग्वाही या खेळाडूने चाहत्यांना दिली आहे. तो खेळाशी जोडला जाईल. फेडररने बुधवारी निवृत्तीच्या संदर्भात सांगितले की, त्याला त्याची औपचारिक घोषणा करायची होती. मला कळले की माझी निवृत्तीची योजना बाहेर फुटणार आहे. त्यामुळे मला तडकाफडकी निवृत्तीची घोषणा आधीच जाहीर करावी लागली.

फेडररने १५ सप्टेंबर रोजी लंडनमधील लेव्हर चषकनंतर त्याचे टेनिस रॅकेट घरातील भिंतीला लटकवणार असल्याचे उघड केले. विक्रमी आठ विम्बल्डनसह २० ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या फेडररने सांगितले की, मी या टेनिसमधून निवृत्ती जरी घेत असलो तरी आयुष्यभर याचं खेळासाठी कुठल्या ना कुठल्या स्वरुपात मागर्दर्शन करत राहील. लंडनच्या ओ2 एरिना येथे पत्रकारांशी बोलताना स्विस खेळाडू काही वेळासाठी भावूक झाला. त्याने येथे दोनदा एटीपी स्पर्धेच्या अंतिम फेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

‘मी महान ब्योर्न बोर्गप्रमाणे स्वतःला दूर ठेवणार नाही’

भविष्यातील त्याच्या योजनांबद्दल विचारले असता, फेडरर म्हणाला, तो स्वीडिश महान ब्योर्न बोर्गसारखा खेळातून पूर्णपणे अंग काढून घेणार नाही. लेव्हर चषकमध्ये फेडरर उर्वरित जगाविरुद्ध युरोपचे नेतृत्व करत आहे. “मी चाहत्यांना सांगू इच्छितो की मी खेळ सोडणार नाही. फेडररने ११ वेळा ग्रँड स्लॅम विजेते के ब्योर्न बोर्गबद्दल सांगितले, ज्याने वयाच्या २६ व्या वर्षी टेनिसमधून निवृत्ती घेतली, कारण निवृत्तीनंतर २५ वर्षे तो विम्बल्डनमध्ये परतला नाही. यामुळे चाहत्यांना खूप दुःख झाले.” “टेनिसने मला खूप काही दिले आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरुपात मी पुन्हा भेटत राहीन. ते कोणत्या प्रकारे अजून सांगता येणार नाही. यासाठी मला थोडा वेळ द्या.”

पुनरागमन करायचे होते, पण गुडघ्याच्या समस्येमुळे निवृत्ती घ्यावी लागली

गेल्या वर्षी विम्बल्डनमध्ये उपांत्यपूर्व फेरीतील पराभवानंतर स्पर्धात्मक खेळ न केलेला फेडरर, त्याचा महान प्रतिस्पर्धी राफेल नदालविरुद्ध दुहेरीच्या सामन्यासह लेव्हर चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचू शकतो हे त्याने सिद्ध केले. फेडरर म्हणाला, त्याला अजूनही कोर्टवर परतायचे होते, पण गुडघ्याच्या समस्येमुळे निवृत्ती घ्यावी लागली. माझा गुडघा मला या स्तरावर खेळायला आता साथ देत नाही. मला हे उन्हाळ्यात समजले आणि मी निवृत्त होऊ शकेन अशी जागा शोधत होतो. राणी एलिझाबेथ ११ च्या आठवणीत फेडरर म्हणाला, “२०१० मध्ये, मला विम्बल्डनमध्ये तिच्यासोबत जेवण करण्याची संधी मिळाली होती.”

हेही वाचा :  अखेरच्या लढतीत नदालच्या साथीने खेळणे हा सर्वोत्तम क्षण – रॉजर फेडरर 

२३ ते २५ दरम्यान लेव्हर चषक स्पर्धेतील दुहेरीची लढत होणार असून ती फेडररची टेनिसच्या कारकिर्दीतील अंतिम लढत असणार आहे. या लढतीत फेडरर नदालच्या साथीने खेळणार आहे. फेडररने सांगितले की, “कारकीर्दीमधील शेवटचा सामना नदालच्या साथीने खेळायला मिळण्यापेक्षा दुसरा सर्वोत्तम क्षण असूच शकत नाही.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या