वृत्तसंस्था, दोहा : फुटबॉलमध्ये सर्वसमावेशकता आणि ‘एलजीबीटीक्यू’ समूहाला पाठिंबा दर्शवण्यासाठी कतार विश्वचषकात ‘वन लव्ह’ दंडपट्टी वापरण्याची इंग्लंड, वेल्स, बेल्जियम, डेन्मार्क, जर्मनी आणि नेदरलँड्स या संघांच्या कर्णधारांनी भूमिका घेतली होती. मात्र, कर्णधारांनी ही दंडपट्टी वापरल्यास त्यांना सामन्याला सुरुवात होताच पिवळे कार्ड दाखवण्यात येईल, असे ‘फिफा’ने स्पष्ट केले. त्यामुळे सहाही फुटबॉल संघटनांनी ‘वन लव्ह’ दंडपट्टी वापरण्याच्या निर्णयावरून माघार घेतली.

‘‘आमच्या कर्णधारांनी ‘वन लव्ह’ दंडपट्टी वापरल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, हे ‘फिफा’ने स्पष्ट केले आहे. आमची आर्थिक दंड भरण्याची तयारी होती. मात्र, कर्णधारांना पिवळे कार्ड मिळण्याचा धोका असल्याने आम्ही ही दंडपट्टी न वापरण्याचे ठरवले आहे. ‘फिफा’च्या निर्णयामुळे आम्ही, आमचे खेळाडू आणि प्रशिक्षक निराश आहेत,’’ असे संयुक्त विधान सहाही फुटबॉल संघटनांनी केले.

Hardik Pandya Mental Health Going Bad Due to IPL 2024 Booing Abuses In Stadium
“हार्दिक पंड्याचं मानसिक आरोग्य बिघडतंय, तो तणावाचा..”, IPL मधील शिवीगाळ, ट्रोलिंग पाहून माजी सलामीवीराची माहिती
MS Dhoni Only Given Limited Batting In CSK Trainer Explains Why
MS धोनीला शेवटच्याच षटकांमध्ये फलंदाजी देण्याचं कारण अखेरीस आलं समोर; प्रशिक्षक म्हणाले, “त्याचे शॉट्स..”
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल
hardik pandya marathi news, hardik pandya mumbai indians marathi news
दोन सामने, दोन पराभव, दोन मोठ्या चुका! कर्णधार हार्दिक पंड्याचे डावपेच मुंबई इंडियन्ससाठी मारक ठरत आहेत का?