scorecardresearch

WPL 2023 : मुंबई इंडियन्सबरोबर धोका झाला? रिचा घोषबाबत अंपायरने दिलेल्या निर्णयाने हरमनप्रीत कौर नाराज; नक्की काय घडलं

रिचा घोष मैदानाबाहेर जात होती, तेवढ्यात पंचाने सांगितलं…

richa ghosh drs controversy
मुंबई इंडियन्सबरोबर धोका झाला? रिचा घोषबाबत अंपायरने दिलेल्या निर्णयाने हरमनप्रीत कौर नाराज; नक्की काय घडलं

महिला प्रिमीयर लीगच्या चौथ्या सामन्यात मुंबई इंडियन्स टीम आणि रॉयल चॅलेजर्स बँगलोर ( आरसीबी ) यांच्यात लढत झाली. या सामन्यात बँगलोरने नाणेफक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, आरसीबीला धावसंख्या उभारता आली नाही. सामन्यादौऱ्यान अंपायरने दिलेल्या एका निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

रिचा घोष ८ व्या षटकात बाद झाली होती. तिला वाटलं आपण बाद झालोय, म्हणून ती मैदानाबाहेर जात होती. तेवढ्यात पंचाने नाबाद असल्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर नाराज असल्याचं दिसून आलं.

हेही वाचा : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त

झालं काय?

आरसीबीची फलंदाज रिचा घोष ८ व्या षटकात खेळत होती. तिसऱ्या चेंडूवर रिचाने फूल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण, हा प्रयत्न फसला आणि चेंडूचा झेल यष्टिरक्षकाने घेतला. रिचाच्या बादची अपील करण्यात आली. रिचाला वाटलं बाद झालो आहे, म्हणून ती बाहेर जात होती. तेवढ्यात पंचाने नाबाद असल्याचा निर्णय दिला.

हेही वाचा : मैदानात धावांचा पडला पाऊस, पण जेमिमा रोड्रिग्स आली प्रकाशझोतात, जेमिमाचा तो Video का झाला व्हायरल?

मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने डीआरसची मागणी केली. पण, चेंडू बॅटला लागल्याचं डीआरएसमध्ये दिसलं नाही. या निर्णयानंतर हरमनप्रीत कौर नाराज झाली. तिचे फोटो समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 23:40 IST